प्रभाग 13 : अतिक्रमण, वाहतूककोंडीने त्रस्त

प्रभाग 13 : अतिक्रमण, वाहतूककोंडीने त्रस्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका पश्चिम विभागात असलेल्या प्रभाग 13 Ward 13 मध्ये जुने नाशिकचा काही गावठाण भाग असून प्रभागाचा अशोक स्तंभपर्यंत विस्तार आहे. सर्वात मोठे क्षेत्र असलेला प्रभाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्रभागात काझीगढीचा गंभीर प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. प्रामुख्याने अतिक्रमण Encroachment , बेशिस्त पार्किंग तसेच वाहतूक कोंडीमुळे traffic congestion त्रस्त आहे.

या प्रभागाला अनेक दिग्गज नगरसेवक लाभले तरी विशेष असा विकास झालेला दिसत नाही. जो काही विकास झाला तो समतोल नसल्याचे जाणवते. स्मार्ट सिटी गोंधळी कारभाराचा फटका येथील दहीपूल व परिसरातील कामांना बसला आहे. यामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

दर पावसाळ्यात अत्यंत धोकादायक झालेल्या काझीगढीचा मुद्दा उपस्थित होतो, मात्र तो प्रश्नअद्याप कायमचा मार्गी लागलेला नाही. प्रभाग 13 मधील ही डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चार वर्षांपूर्वी प्रशासनाला गढी रिकामी करावी लागली होती. तर दोनवेळा गढीवरील माती सरकल्याने मोठे अपघात झाले आहेत. अद्यापही येथील लोक आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगात आहेत. यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्रशासनाने येथील बर्‍याच लोकांना पर्यायी घरे दिली तरी लोकांचे समाधान झालेले नाही. तर दुसरीकडे वडिलोपार्जित घरे सोडायला येथील लोक तयार नसून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी स्थानिक नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केल्यास याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे प्रभाग 13 हा वंदे मातरम् चौक, गंगाकिनारा, खैरे गल्ली, नाईकवाडीपुरा, अजमेरा चौक, चव्हाटा, पठाणपुरा, पाटील गल्लीपासून थेट महात्मा गांधीरोड, अशोक स्तंभ, यशवंत व्यायामशाळा आदी परिसरात विस्तारला गेलेला आहे. यामुळे नगरसेवकांनादेखील कामे करताना धावपळ करावी लागते. मागील सुमारे नऊ महिन्यांपासून प्रभाग 13 मधील दहीपूल व परिसरात स्मार्ट सिटीने खोदकाम करून ठेवले आहे, मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

स्थानिक नगरसेवकांनी वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे महासभा, स्थायी समिती सभा तसेच विशेष सभेतही याबाबत आवाज बंद करण्यात आला आहे. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. या ठिकाणाहून मानाचा रथ जातो. मागील 250 वर्षांपूर्वीची ही परंपरा स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे धोक्यात आली आहे. हा प्रश्न प्रत्येकाला भडेसावत आहे.

पार्किंगची समस्या कायम

प्रभाग 13 मध्ये रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे कायम वाहतूककोंडी राहते. त्र्यंबक रस्ता या भागात अनेक हॉटेलचालकांनी थेट रस्त्यावर कब्जा केल्याचे दिसून येते. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून या भागातून आपले वाहन काढावे लागते. त्याप्रमाणे अशोक स्तंभ, महात्मा गांधीरोड या ठिकाणीदेखील तीच समस्या निर्माण झाली आहे.

अतिक्रमणाचा मुद्दा

जुना गावठाण भाग तसेच नवीन भाग या प्रभागात समाविष्ट होतो. तसेच रस्ते जास्त असल्यामुळे सर्व व्यावसायिक भागदेखील या प्रभागात सामील होतो. मेनरोड आदी भागातील व्यापार्‍यांनी थेट रस्त्यावर आपली दुकाने मांडण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अतिक्रमण, वाहतूककोंडी व रहदारीचा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने योग्य दखल घ्यावी. स्थानिक व्यापारी, नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे. गावठाण भागात विकास व्हावा. जुने नाशिक क्लस्टर अंमलबजावणी व्हावी.

- निखिल सरपोतदार

शहराची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कायम गर्दी राहते, मात्र वाहतुकीचे कोणतेही नियोजन नाही. एफएसआयबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्मार्ट सिटी कंपनीने दहीपूल व संपूर्ण बाजारपेठ परिसराची स्मार्ट वाट लावलेली आहे. मार्ग मोकळे करून विकास व्हावा. अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याबाबत त्वरित उपाययोजना व्हाव्यात.

- मनोज घोडके

Related Stories

No stories found.