प्रभाग 12 : अर्धा झकास, अर्धा भकास

प्रभाग 12 : अर्धा झकास, अर्धा भकास

नाशिक । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक शहराची ओळख ज्या प्रभागामुळे होते, त्या प्रभाग क्रमांंक 12 ची अवस्था सध्या अर्धा झकास व अर्धा भकास अशी झाली आहे.

कॉलेज रोड college road nashik , महात्मानगर mahatma nagar , शरणपूररोड sharanpur road, ते मुंबइ नाका mumbai naka सीबीएस CBS पर्यंंत विस्तारलेल्या या प्रभागााला आतापर्यंंत तीन स्थायी समीती सभापती लाभले. त्यात उत्तमराव कांबळे, सुरेश पाटील, व शिवाजी गांगुर्डे यांचा समावेश होता. त्यांच्या सभापती पदाच्या कारकीर्दीत जेवढी विकासकामे झाली तेवढ्यावर आता पर्यंंत समाधान मानावे लागत आहे.

कॅालेज रोडचे काँक्रिटीकरण, रामदास उद्यानाची निर्मिती, जीम, अधुनिक पथदीप, जॉगिंग ट्रॅक या प्रभागात निश्चित झाले. मात्र त्यानंतर निर्माण झालेले श्रध्दा पेट्रोल पंपाच्या जवळील एक उद्यान सध्या दिवसा प्रेमीयुगलांंचा व रात्री मद्यपींचा अड्डा झाला आहे. या ओपन बारचा त्रास आजुबाजुच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यांची अवस्था सहन होेत नाही अन सांगताही येत नाही. अशी झाली आहे. कारण विरोध केला तर अंगलट येण्याचीच भीती त्यांना आहे.

या प्रभागात आमदार, माजी खासदारांसह विविध पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी राहतात. महापालिकेचे मख्यालय सुध्दा या प्रभागात आहे.

मात्र वरवर झकास वाटत असलेल्या या प्रभागात अंंतर्गत जाऊन पाहणी केल्यास दिव्याखाली अंधार अशी स्थीती आहे. चार पाच झोपडपट्ट्या आहे. तेथेे नागरी सुविधांची वानवा आहे. फवारणी वेळच्या वेळी होत नाही. डासांचा उपद्रव कायम आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुणीयाने झोपडपट्टीतील गरीब नागरीक त्रस्त आहेत.

गेल्या दहा वर्षापुर्वी कॉलेजराडेचे काँक्रीटीकरण झाले. त्यानंतर सीबीएस ते कॅनडा कॉर्नर पर्यंंत रस्त्याचे अत्याधुुनीकरण झाले असते तर सीबीएस ते भोसला स्कुल पर्यंंत रस्ता अद्यावत झाला असता. मात्र त्या शरणपुररोडला काही मुहूर्त लागला नाही. ज्या तिबेटीयन मार्केटमध्ये तिबीटीयन बांधवांना गाळे दिले. त्या ठिकाणीच शेजारी मेाठे चायनीज खाद्य पदार्थाचे मार्केट उभे राहीले आहे.

मात्र त्या मार्केटचा ठकाणी दिल्लीतील मार्केटच्या धर्तीवर येथे चांगले मार्केट उभे केले असते तर महापालिकेला कायम स्वरुपी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले असते. मात्र ती मोक्याची जागा अशा प्रकारे ठऱाविक मंडळींंना उपलब्ध करुन देऊन काय साध्य झाले? याचे कोडे उलगडत नाही.

निम्मे रस्ते डांंबरी - या भागात काही रस्ते काँंक्रीट व डांेंंबरी केले. मात्र ते निम्मेच झाले. निम्मे अर्धवट कायम आहेत. ते कधी पूर्ण होतील हे सांगता येत नाही.

उद्यानाची दुरवस्था - येथे एक दोन उद्याने चांंगली आहेत. मात्र जे नव्याने झाले त्याकडे दुर्लक्ष आहे.त्यातील कारंंंजा बंद पडून तेथ कचरा साचला आहे. पावसाळ्यात पाणी साचूुन डास निर्मिती होण्याचा धोका आहे.

आरोग्याची समस्या - येथे शरणपूर, सिध्दार्थ नगर, संजय नगर अशा झोपडपट्ट्या आहे तेथे आवश्यक सुविधा नसल्याने व फवारणी होत नसल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. थंडीतापाचे रुग्ण सतत आढळत आहे.

भाजीबाजार नावालाच - शरणपूर चर्च समोर महापालिकेने मोठा खर्च करुन भाजी बाजार उभारला. मात्र तेथेे विक्रेत्यांना बसणे बंद केले आहे. तो बाजारही आता ओस पडला आहे.

पार्किंगची मोठी समस्या- कॅनडा कॉर्नर ते कॉलेजरोडपर्यंंत पार्किंगची मोठी समस्या आहे. मोठमोठी दुकाने दिसतात, मात्र गाडी पार्क करायची कोठे हा प्रश्न प्रत्येकाला भडेसावतो.

पाण्याची समस्या

कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रु वसाहतीत आपण राहतो याचे समाधान मिळण्यासाठी मोठी तरतूद करून घर घेतले जाते. मात्र कमी व्यासाच्या जुन्या जलवाहिन्यांमुळे वरच्या मजल्यावर पाणीच चढत नाही ही समस्या आहे.

अर्धवट बांधकामांमुळे डासांंचा उच्छाद

येथ काही बांधकाम व्यावसायिकांंनी अर्धवट बांधकाम करुन ठेवले आहे. काहींनी जमीन घेतल्या आहे तेथे बांधकाम साहित्य ठेवलेले असते. तेथे पावसाचे पाणी साचते. त्यामुळेही डास वाढतात, याकडे महापालिकेने लक्ष्य देऊन नोटिसा काढणे गरजेचे असताना त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे पाणी कोठे मुरते, हा प्रश्न नागरिकांना पडतो.

वृद्धांची सुरक्षा

येथे बर्‍याच पालकांची मुले परदेशात शिक्षणसाठी अथवा नोकरीसाठी गेलीे आहेत. येथे वृद्ध पालक घरात एकटे राहतात. त्यांंच्याकडे चोर्‍या होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याकडे पोलिसांनी लक्ष्य देणे गरजेचे आहे. मात्र त्या प्रश्नाकडे कानाडोळा होत आहे.

येथील झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधांंची वानवा आहे. नियमित फवारणी होत नाही. त्यामुळे डासांंची उत्पत्ती वाढून चिकनगुणीयाने नागरिक त्रस्त आहे. महापालिकेकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो तेव्हा कोठे अधिकारी दाद देतात. हे चित्र बदलणे गरजेचेे आहे.

- संजय वाघमारे

येथे पार्किंगची मोेठी समस्या आहे. तसेच जुन्या 20 वर्षे पूर्वीच्या कमी व्यासाच्या जलवाहिन्यांमुळे आता वरच्या मजल्यावर पाणीच जात नाही अशी अवस्था आहे. येथे चार नगरसेवक आहे, प्रत्येेकाला वाटते तो काम करेल मात्र लक्ष्य द्यायचे कोणी हा मोठा प्रश्न आहे.

- विनोद येवला

Related Stories

No stories found.