डाक विभागात पॉलिसी एजंट व्हायचंय? 'असा' करा अर्ज
भारतीय डाक विभाग

डाक विभागात पॉलिसी एजंट व्हायचंय? 'असा' करा अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक डा‍क विभागात (Nashik Postal Department) टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल विमा योजना पॉलिसी एजंट (Policy agent) निुयक्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे...

त्यासाठी 13 ऑगस्ट 2021पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर, नाशिक विभाग यांनी केले आहे.

नाशिक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल विमा योजना पॉलिसी एजंट या पदाकरिता उमेदवार इयत्ता 10 अथवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.

उमेदवारास संगणक व स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारास याबाबत प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर परवाना मिळण्यासाठी उमेदवारास परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. उत्तीर्ण उमेदवारास 5 हजार रूपये सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे बंधनकारक आहे.

या पदासाठी स्वयंरोजगारीत तरूण, सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी काम करीत असलेले विमा प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी, सेवानिवृत्त ‍शिक्षक, बचत गट प्रतिनिधी, महिला मंडळ सदस्य हे अटी पूर्ण करीत असल्यास यांची नेमणूक मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

इच्छुकांनी विहित मुदतीत प्रवर डाक अधीक्षक नाशिक येथे अर्ज रजिस्टर अथवा स्पीड पोस्टाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी पोस्टमास्तर नाशिक हेड ऑफीस येथे किंवा विकास अधिकारी एस. पी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रवर अधिक्षक डाकघर, नाशिक विभागाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com