कळवण : मोहबारी येथे भिंत कोसळून महिला जखमी

कळवण
कळवण

दिंडोरी | Dindori

कळवण तालुक्यातील मोहबारी येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

मोहबारी येथील विठ्ठल जयराम आहिरे यांच्या घराची भिंत रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान कोसळली. यावेळी विठ्ठल यांच्या आई शांतीबाई झोपेत असताना त्यांच्या डोक्यात विटेचा तुकडा पडून त्या जखमी झाल्या. सुदैवाने त्या बाल बाल बचावल्या. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. घरातील काही संसारोपयोगी वस्तूंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान विठ्ठल यांचे घर साधे मातीत बांधलेले असल्याने त्याच्या इतरही भिंती पडण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांना मदत झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com