शेतकर्‍यांना 15 दिवसांत टोल माफ करा

आ.कोकाटे यांचा आंदोलनाचा इशारा
शेतकर्‍यांना 15 दिवसांत टोल माफ करा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) शिंदे येथील टोलनाक्यावर (Toll Naka) सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) रहिवाशी तसेच शेतकर्‍यांच्या (Farmers) वाहनांना येत्या 15 दिवसांत टोल माफ (Toll free) न झाल्यास तीव्र आंदोलन (Movement) करुन टोल नाकाच तोडून टाकण्याचा इशारा आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी भ्रमणध्वनीद्वारे टोल प्रशासनाला दिला आहे.

तालुक्यातील शेकडो नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी व उद्योजक दररोज सिन्नर-नाशिक प्रवास करीत असल्याने त्यांना टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हयातील घोटी (Ghoti) व संगमनेर (Sangamner) टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना पुर्णपणे टोल माफ आहे. याच धर्तीवर शिंदे टोलनाक्यावर देखील सिन्नर तालुक्यातील रहिवाशी, शेतकर्‍यांच्या वाहनांना पुर्णपणे टोल माफ करण्यात यावा.

यासाठी काही दिवसांपूर्वी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Rashtrawadi Congress) पदाधिकार्‍यांकडून टोलनाका व्यवस्थापक, नाशिक तहसिलदार, पोलिस प्रशासनाला निवदेन देऊन त्वरीत स्थानिकांना टोल माफ करण्याची मागणी केली होती. नुकतेच आ. कोकाटे यांनी टोल व्यवस्थापकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन इशारा दिला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार 20 किमी परिसरात टोल आकारला जात नाही. इथे राजरोसपणे सर्वांकडून टोल वसूल करुन टोल व्यवस्थापनाकडून कायद्याचे (Violation of law) उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सांगितले. हे नियम पाळत नसाल तर आम्हालाही तोडफोड केल्याशिवाय पर्याय नसून 15 दिवसांत यात सुधारणा न झाल्यास स्वत: येऊन टोल नाका तोडून टाकणार असल्याचे त्यांनी व्यवस्थापकाला सांगितले.

त्यांचा टोल प्रशासनासह संबंधीत अधिकार्‍यांशी झालेल्या संवादाचा व्ही. डी. ओ. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral on social media) होत आहे. त्यामुळे टोल व्यवस्थापनाकडून काय निर्णय घेतला जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.