दिवाळीनंतर प्रतीक्षा तुळशी विवाहाची

दिवाळीनंतर प्रतीक्षा तुळशी विवाहाची

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिवाळीचे ( Diwali Festival-2022 ) मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच (Tulsi marriage) खर्‍या अर्थाने दिवाळीची सांगता होते. आषाढी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिने निद्रस्थ होतात. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे संबोधले जाते. या काळात कोणतीही शुभ कार्य, लग्न समारंभ शक्यतो केले जात नाहीत, अशी मान्यता आहे.

कार्तिकी एकादशीला ( Kartiki Ekadashi )म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करून सजवितात.

कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.

तारीख व मुहूर्त

यंदा कार्तिक एकादशी 4 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुलसी विवाह सुरू होतात. तुळशीचे लग्न 5 नोव्हेंबरपासून सुरु होतील. 8 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुलसी विवाह साजरे केले जातील. यंदा 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com