बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रकाची प्रतीक्षा

परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रकाची प्रतीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

आयटीआयमध्ये विविध ट्रेडला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या 2020 मधील परीक्षा मार्च-2021मध्ये घेण्यात आल्या. त्याचा निकाल अद्याप जाहीर नाही. त्यासह 2017 व 2018 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या मुळ परीक्षा झाल्या, परंतु बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षार्थींची परीक्षा अद्याप झालेली नाही. 2017 व 2018 शैक्षणिक वर्षात प्रवेशित हे विद्यार्थी आहेत. परीक्षाच नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. करोनामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबल्या त्यासह परीक्षांचे वेळापत्रकही लांबले. आयटीआयमध्ये विविध ट्रेडला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या 2020 मधील परीक्षा मार्च-2021मध्ये घेण्यात आल्या. त्याचा निकाल अद्याप जाहीर नाही.

त्यासह 2017 व 2018 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या मुळ परीक्षा झाल्या, परंतु बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. एक, दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन दोन, तीन वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु वेळापत्रक जाहीर नसल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत. मुळ परीक्षा झाली परंतु काही विद्यार्थ्यांचे एक-दोन विषय राहिले, काहींचे प्रात्यक्षिक अपूर्ण आहे.

अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने या विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही मिळत नाही. 2019 व 2020मधील नियमित विद्यार्थ्यांची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा झाली. त्यानंतर या परीक्षा होणार होत्या. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि परीक्षा लांबल्या. परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्याने दोन्ही वर्षाच्या बॅकलॉग ऑफलाइनच घेण्यात येतील असे सांगण्यात येते. विद्यार्थी आयटीआय प्राचार्यांकडे परीक्षांबाबत चौकशी करीत आहेत, परंतु निश्चित वेळापत्रक आलेले नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com