दिंडोरी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध
दिंडोरी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

ओझे । वार्ताहर Oze/ Dindori

दिंडोरी तालुक्यात ( Dindori Taluka ) पावसाने ओढ दिल्यामुळे( Lack of Rain ) बळीराजाची पेरणी खोळंबली असून खरीप हंगाम हातातून जाणार की काय, अशी चिंता शेतकरीवर्गाला लागली आहे. तालुक्यात बहुसंख्य शेतकरी ( Farmers )पेरणीसाठी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणीपासून वंचित आहे.

तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग पेरणी बाकी असून ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे, त्या पिकांना पाऊस न पडल्यामुळे फटका बसला असून अनेक शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामाला उशीर झाल्यामुळे पुढे रब्बी हंगामावरही परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होण्याची शक्यता बळीराजाकडून वर्तवली जात आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्गाची भात आवणी पाऊस नसल्यामुळे खोंळबली आहे. अनेक ठिकाणी भाताची रोपे आवणी योग्य होऊनही पावसाने ओढ दिल्याने भात आवणी थांबली आहे. दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजरी लावली असून यामुळे पिकांना जीवदान मिळेल मात्र जमिनीत पुरेशा प्रमाणात ओल नसल्यामुळे पेरणी होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरीवर्गाला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.

निफाड, येवला, मनमाड तालुक्यालाही या धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दिंडोरी तालुक्यात पुरेसा पाऊस पडून धरणे भरली तर इतर तालुक्याला पुरेशा प्रमाणात पाणी मिळते त्यांमुळे दिंडोरी तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणीसाठा चिंताजनक राहिला आहे. सध्या करंजवण धरणामध्ये 6.50% पाणी साठा शिल्लक असून वाघाड धरणामध्ये 2.66 % पाणीसाठा शिल्लक आहे तर पुणेगाव धरणामध्ये 6.68% पाणीसाठा शिल्लक आहे.

तिसगाव धरणातील पाणीसाठा 0.77 मध्ये या धरणाने तळगाठला आहे. त्याचप्रमाणे ओझरखेड धरणात 25.43% पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक ठेवण्यात आला आहे. करंजवण धरणातून पालखेड धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पालखेड धरणातील पाणीसाठा 29.43% इतका शिल्लक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com