दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा
नाशिक

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा

वाटप लांबणीवर

Bharat Pagare

नाशिक | Nashik

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा आॅनलाइन निकाल बुधवारी दि.२९ जुलैला जाहीर झाला. आॅनलाईन निकालाला आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती दहावीच्या गुणपत्रिका आलेल्या नाहीत.

राज्य मंडळाने गुणपत्रिकांच्या वाटपाविषयी विभागीय मंडळाना कोणतेही नियोजन कळविलेले नसल्याने बारावी प्रमाणे दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरणही लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन निकालाची प्रत अपलोड करण्याची सवलत दिली असल्याने विद्यार्थ्यांना थाेडा दिलासा मिळाला आहे.

नाशिक विभागातून एकूण १ लाख ९७ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ५५७ म्हणजे ९३.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ८४ हजार ५५८ विद्यार्थ्यांचा समावेश असून धुळे २७ हजार ३३१, जळगाव ५५ हार २४० व नंदुरबार जिल्ह्यातील १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांच्या मूळ प्रतीची आवश्यकता भासणार आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरताना विद्यार्थ्यांना आॅनलाईन गुणपत्रिकेची प्रत अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com