जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा

जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जुलै महिनाच्या पंधरवडा उजाडला असला तरी जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील नऊ दिवसात जिल्हयात एक हजार ४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. उर्वरित जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्रिवादळामुळे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला.त्यानंतर मोसमी वारे राज्यभरात सक्रिय झाले. त्यामुळे नाशिक शहर, उपनगरिय परिसराला पावसाने धुवून काढले होते. सलग एक आठवडा दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण परिसरात पावसाचा जोर होता. त्यामुळे गंगापूर धरण ५० टक्के भरले असून नाशिककरांचे पिण्याच्या पाण्याचे संकट जवळपास दूर झाले. नांदूरमध्यमेश्वर धरणातून मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

मागील महिन्यात जुनची सरासरी पावसाने भरुन काढली. जूनच्या प्रारंभी मराठवाडा, विदर्भ कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात दमदार पाउस पडत आहे. मात्र येवला, सिन्नर, निफाड, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यल्प आहे.

वरील तालुक्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा असून शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रारंभी चांगला पाउस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र अपक्षेप्रमाणे पावसाची वाटचाल नसल्याने दुबार पेरण्याचे संकट ओढावले आहे.

तालुकानिहाय पाऊस

(१ ते ९ जुलै)

नाशिक - ५९.८, इगतपुरी - ३७७, दिंडोरी - १४, पेठ - १३८.८, त्र्यंबकेश्वर- १५१, मालेगाव - ७०, चांदवड - ७५, कळवण - ६९, बागलाण - ५६, सुरगाणा - १२६, देवळा - १०२, निफाड - ६५, सिन्नर - २५, येवला - ४९

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com