प्रतिक्षा निधीची: दोन महिन्यांपासून रस्ता उकरून पडलाय

टोकदार दगडांनी वाहनांचा खोळंबा
प्रतिक्षा निधीची: दोन महिन्यांपासून रस्ता उकरून पडलाय

चिंचखेड । तुषार झेंडफळे Chinchkhed - Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) चिंचखेड (chinchkhed) - जऊळके वणी या रस्त्याची गेल्या दोन महिन्यांपूर्वी हा रस्ता जेसीबीच्या (JCB) सहाय्याने उकरून ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यावर पूर्णतः दगडांचा पसारा आहे. यामुळे अपघात (accident) तर होतच आहे. परंतु वाहनांचा देखील बोजवारा उडत चालला आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती (road repair) करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

चिंचखेड - जऊळके वणी हा रस्ता आता अपघात केंद्र म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर अनेकदा वाहनचालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जऊळके वणीपासून चिंचखेडकडे येणार्‍या रस्त्यावर भलेमोठे खड्डे (potholes) देखील पडले असून वाहन चालकांना पाच मिनिटाचा प्रवास करण्यासाठी अवघा अर्धा तास लागत आहे. त्यातच जवळ के पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Pimpalgaon Agricultural Produce Market Committee) आहे त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ (traffic) सुरू असते.

या बाजार समितीमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकर्‍यांचा (farmers) शेतमाल (Commodities) येत असतो. वणी (Vani), दिंडोरी (dindori) या भागातील शेतकरी जऊळके ते चिंचखेड या मार्गाने शेतीमाल बाजार समितीमध्ये आणतात. वाहनांमध्ये शेतीमाल लोडिंग असल्याने या रस्त्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन बाजार समिती पर्यंत आणावे लागते. अनेकदा या रस्त्यावर शेतीमालाची वाहतूक करणार्‍या वाहनांचा अपघात देखील झालेला आहे.

वारंवार या रस्त्यावर अपघाताची मालिका चालूच असते. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर खूपच भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते. मोठमोठे खड्डे या रस्त्यावर असल्याने पावसाचे पाणी या रस्त्यावरचे बसलेले असते त्यामुळे वाहनचालकांना वाहनाचा अंदाज येत नाही अशा वेळी देखील अपघाताचे प्रमाण वाढीस लागते.

दिंडोरी तालुक्याच्या लगतच असलेल्या निफाड तालुक्याचे (niphad taluka) आमदार बनकर (mla dilip bankar) यांचे पिंपळगाव ते चिंचखेड हद्दीपर्यंत रस्त्यांबाबत चे कार्य चांगले आहे. परंतु दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत रस्त्यांची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींबाबत जनता रोष व्यक्त करत आहे. दिंडोरी तालुक्याला रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी वाली राहिला की नाही? असा देखील प्रश्न सर्वसामान्यामध्ये पडला आहे.

दिंडोरी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. तालुक्याला जोडणारे आणि विविध बाजार कडे जाणार्‍या रस्त्यांची पूर्णतः वाट लागली आहे. चिंचखेड जवळके रस्ता जेसीबी च्या सहाय्याने उकरून त्या रस्त्याची आणखीनच वाट लागली आहे. त्यामुळे चा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु वाहनांची देखील दुर्दशा होत आहे.

- शिवानंद संधान, ग्रामस्थ चिंचखेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com