किसान रेल्वेला वॅगन वाढवाव्यात : जगताप

किसान रेल्वेला वॅगन वाढवाव्यात : जगताप

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

सध्या परिसरात द्राक्ष हंगाम (Grape season) सुरू झाला असून शेतकरी (farmers) व व्यापार्‍यांना द्राक्षे पिकासह (Grape Crop) कांदा (onion), भुसार, तेलबिया (Oilseeds), डाळींब (Pomegranate), फळे (Fruits), भाजीपाला (Vegetables) आदी शेतमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेची (Kisan Railway) वॅगन (Wagon) अपुरी पडत आहे.

त्यामुळे मध्य रेल्वेने (Central Railway) किसानसेवा रेल्वेला तीन ते चार वॅगन वाढवून देण्यात याव्या अशी मागणी लासलगाव बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप (Chairman of Lasalgaon Market Committee Suvarna Jagtap) यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Bharti Pawar) यांचेकडे केली आहे.

सुवर्णा जगताप यांनी नामदार भारती पवार यांना दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती म्हणून लासलगाव बाजार समितीचा (Lasalgaon Market Committee) उल्लेख केला जातो. या बाजार समितीत कांदा, भुसार, तेलबिया, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारच्या भाजीपाला खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. परीसरातील शेतकरी वरील शेतीमालाबरोबर मोठ्या प्रमाणात द्राक्षे या शेतीमालाचे देखील उत्पादन घेत आहे.

त्यानुसार केंद्र शासनाने (central govenment) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) वरील प्रमुख शेतीमाल पिकांचा विचार करून मध्य रेल्वेची किसानसेवा रेल्वे सुरू (Kisan Seva Railway) केलेली असून सदर किसानसेवा रेल्वेने लासलगाव (lasalgaon) व परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधव लासलगाव रेल्वे स्टेशनवरून (Lasalgaon Railway Station) मोठ्या प्रमाणात त्यांचा कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठवित आहे.

परंतू मध्य रेल्वेने किसानसेवा रेल्वे गाडीस यापूर्वी लासलगाव स्टेशनवर (Lasalgaon Railway Station) दोन बॉक्स (व्हीपी) उपलब्ध करून दिले होते. मात्र मागील दहा दिवसांपासून मध्य रेल्वेने लासलगाव स्टेशनवर किसानसेवा रेल्वे गाडीच्या दोन बॉक्सची (व्हीपी) संख्या कमी करून आजमितीस फक्त एकच बॉक्स (व्हीपी) उपलब्ध करून दिलेला आहे.

त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास सदर किसानसेवा रेल्वे गाडीने त्यांचा कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठविण्यास अडचण येत आहे. तसेच सध्या लासलगाव व परीसरात शेतकरी बांधवांचा द्राक्षे काढणीचा हंगाम सुरू झाला असून सदर द्राक्षे हा शेतीमाल किसानसेवा रेल्वेच्या एका बॉक्स (व्हीपी) मध्ये परराज्यात पाठविण्यासाठी येथील व्यापारी व शेतकरी वर्गास अडचण निर्माण होणार आहे.

तरी वरील सर्व वस्तुस्थितीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून लासलगाव परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधवांना त्यांचा कांदा, डाळींब, द्राक्षे, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरगावी पाठविता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगाव स्टेशनवर किसानसेवा रेल्वेचे तीन ते चार बॉक्स (व्हीपी) वाढवून मिळावे अशी मागणी जगताप यांनी निवेदनात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com