आयबीजेए' च्या को-इंचार्ज इंडीया पदी नाशिकचे वडनेरे

आयबीजेए' च्या को-इंचार्ज इंडीया पदी  नाशिकचे वडनेरे

नाशिक | Nashik

राष्ट्रीय मेंबरशिप कमेटीमध्ये को-इंचार्ज इंडीया या अत्यंत महत्त्वाच्या पदी नाशिक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी किशोर वडनेरे यांची निवड झाली आहे.

या केंद्रीय संस्थेवर वडनेरे यांची निवड झाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आयबीजेएचे केंद्रीय सचीव सुरेंद्र मेहता व अनुराग रस्तोगी यांनी नुकतेच या संदर्भातील नियुक्तीचे पत्र वडनेरे यांना दिले आहे. तर त्यांच्या या निवडीचे आयबीजेए महाराष्ट्रचे विजय लष्करे, किरण अळंदीकर, आविश सराफ, चेतन राजापूरकर आदींसह आयबीजेएच्या राष्ट्रीय मेंबरशिप कमिटीने स्वागत केले आहे.

भारतात सोन्या-चांदीच्या बाजार भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सन १९१९ साली स्थापन झालेल्या या देशव्यापी संस्थेवर किशोर प्रकाश वडनेरे यांच्या रूपाने तब्बल शंभर वर्षांच्या इतिहासांत पहिल्यांदाच एका नाशिककराला महाराष्ट्रातून आयबीजेए या ऐतिहासिक वारसा असलेल्या संस्थेत राष्ट्रीय नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याने वडनेरे यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com