वडांगळीचे मिनी कोविड सेंटर ठरले जिल्हाभरासाठी आदर्श

सरपंच योगेश घोटेकर यांची दुरदृष्टी ; गावागावात हातेय अनुकरण
वडांगळीचे मिनी कोविड सेंटर ठरले जिल्हाभरासाठी आदर्श

सिन्नर । प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असताना वडांगळी ग्रामपंचायतीने राबविलेल्या लोकसहभागातून मिनी कोविड सेंटर हा प्रयोग जिल्हाभरासाठी पथदर्शी ठरला आहे. गावातील खासगी डॉक्टारांनी मोफत आणि नियमीत रुग्णसेवा, ऑक्सिजनसह सर्व प्रकारची औषधे, राहण्याची, जेवणाची योग्य सुविधा, शौचालय, कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी करमणुकीची सुविधा, नियमीत योगासने आणि अंघोळीसाठी गरम पाणी असे समारात्मक वातावरण असलेले हे मिनी कोविड सेंटर जिल्हाभरासाठी आदर्श ठरले असून तालु्नयासह जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी या केंद्राचे अनुकरण करण्यास सुरूवात केली आहे.

दुसर्‍या लाटेतील कोरोना ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यातच ग्रामिण भागातील नागरिक भितीपोटी चाचणी करण्यास धजावत नाही. अनेकजन सुरूवातीला आजार अंगावर काढत असल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढते. तसेच कुटुंबात विलगीकरणासाठी पुरेशी जागा नसल्याने कुुटुंबातील इतरांना संसर्गाचा धोका मोठा असल्याची बाब लक्षात घेत वडांगळी येथील सरपंच योगेश घोटेकर यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या दातृत्वातून पंधरा दिवसांपुर्वी येथील जिल्हा परीषद शाळेच्या इमारतीत जिल्ह्यातील पहिल्या मिनी कोविड सेंटरची सुरूवात करण्यात आली. गावातील चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची याठिकाणी विलगीकरणाची व्यावस्था करण्यात आली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी आणि गावातील दोन खासगी डॉ्नटरांकडून याठिकाणी नियमीत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. अशा सेविकांकडून दिवसातून दोन वेळेस रुग्णांची ऑ्निसजन चाचणी होत आहे. कोविड सेंटर साठी विनाशुल्क सामाजिक जाणिवेतून डॉ ज्ञानेश्वर म्हाळणकर हे नियमीत प्राणायाम व योगासनाचे धडे रुग्णांना देतात. ग्रामपंचायत कर्मचार्यांमार्फत होणारी निर्जंतुकीकरण फवारणी तसेच येथील उपकेंद्राचे प्रमुख डॉ. दिपक राऊत आणि डॉ सचिन निकम व डॉ माणिक अडसरे या खासगी डॉकटरांकडून सकाळ, संध्याकाळ नियमीत होत असलेली रुग्ण चिकित्सा या सर्व बाबी कौतुकास्पद आहे.

आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव यांनी या केंद्राला भेट देत लोकसभागातून तसेच खाजगी डॉकटर्सच्या मदतीने उभे केलेले कोविड केयर सेंटर हा पथदर्शी प्रकल्प असून इतर गावांनी याबाबत आदर्श घेऊन कोरोनावर मात करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार तालु्नयासह जिल्हाभरातील विविध गावांनी याचे अनुकरण करण्यास सुरूवात केली आहे. आता पर्यंत 28 रुग्ण सेंटर मध्ये दाखल झालेले असून त्यापैकी 10 रुग्ण हे पूर्ण पणे बरे होऊन घरी परतले आहे. 2 रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उर्वरित 16 रुग्ण सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.

दातृत्वाचा ओघ सुरूच

या मिनी कोविड सेंटरसाठी सरपंच घोटेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजकारण बाजुला ठेवत दातृत्वाचा ओघ सुरू आहे. वडांगळी व परिसरातील नागरिकांकडून सुमारे दोन लाख रुपये रोख स्वरूपात वर्गणी, सुमारे 25 बेड, ऑक्सिमेंटर, टेम्परेचर गण, वाफेचे मशीन, विविध औषधे, मोफत पिण्याचे शुद्ध पाणी आदी प्रकारच्या सुविधा येथील ग्रामस्थांकडून दान स्वरुपात देण्यात येत असून मदतीचा ओघ सुरूच आहे.

इंदुरीकरांचे किर्तनाने मानसिक ताण कमी

वडांगळी येथील लोकसहभागतीलल कोविड सेंटरमध्ये प्रत्येक खोलीत टिव्हीची व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी कारोनाची भीती पसरविणार्‍या बातम्या न दाखविता इंदुरीकर महाराजांचे किर्तन आणि मानसिक ताण कमी करणारे विविध कार्यक्रम रुग्णांना दाखविले जातात. एकाच गावातील रुग्ण असल्याने परस्परंशी गप्पा मारण्यात देखील रुग्णांचा वेळ जात असल्याने कुटुंबापासून दुर राहिल्याची खंत वाटत नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com