घनकर लेन परिसरात वाडा कोसळला; दोन महिला जखमी, परिसर केला रिकामा

घनकर लेन परिसरात वाडा कोसळला; दोन महिला जखमी, परिसर केला रिकामा

नाशिक | प्रतिनिधी

रविवार कारंजा येथील सचदे अगरबत्ती दुकानाजवळ आज (दि. ०३) रोजी सायंकाळी वाडा कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून या महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाड्याचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून १० ते १५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे....

येथील जोशी नामक व्यक्तीचा वाडा आहे. काही दिवसांपासून हा वाडा पाडून याठिकाणी पोकलंडने खोदकाम सुरु होते. जोशी यांच्या शेजारीच वैश्य नामक कुटुंबियांचा वाडा आहे.

आज सायंकाळी वैश्य कुटुंबीय हॉलमध्ये बसलेले असताना वाड्याची भिंत कोसळली. यादरम्यान, हॉलमध्ये बसलेल्या संगीता अजित वैश्य (५५) आणि रिता वैश्य (२७) या दोन्ही महिला खाली कोसळल्या.

या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रसंगावधान राखत परिसर रिकामा करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे, त्याठिकाणी आजूबाजूला जुने वाडे आहेत. त्यामुळे परिसर भीतीच्या सावटाखाली आला आहे.

अनेकदा काम थांबविण्यासाठी जोशी यांना सांगूनही, त्यांनी येथील रहिवाशांचे ऐकले नाही. जोशी यांच्या कामामुळेच वाडा कोसळल्याचा आरोप वैश्य कुटुंबातील सदस्य विनोद खेमचंद वैश्य यांनी केला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वैश्य कुटूंबाने पोलिसांकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com