जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी उद्या मतदान

पंधरा जागांसाठी ' आपला '- ' सहकार ' पॅनलमध्ये सरळ लढत
जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी उद्या मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची (Zilla Parishad Employees Co-operative Credit Society )बिनविरोधाची हॅटट्रीक हुकल्यानंतर सत्ताधारी आपला व विरोधकांच्या सहकार पॅनलमध्ये सरळ लढत होत असून दोन्ही पॅनलकडून जोरदार आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवत जोरदार प्रचार करण्यात आल्याने चागलीच चुरस निर्माण झाली आहे.

रविवारी (दि.६) पंधरा जागांसाठी नाशिकमध्ये मराठा हायस्कूल, गंगापूर रॉड येथे सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात होईल.शुक्रवारी (दि.४) ग्रामीण भागासह जिल्हा परिषद मुख्यालय व नाशिक पंचायत समितीत दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

आपला पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण गट - भाऊसाहेब नामदेव गांगुर्डे, ज्ञानेश्वर मनोहर गायकवाड, रोहिदास कृष्णा जाधव, दिनेश शिवराम टोपले, कानिफनाथ मुकुंदराव फडोळ, दिनकर खंडेराव सांगळे, योगेश गणपत बोराडे,

इतर मागास प्रवर्ग - प्रकाश शिवाजी थेटे,

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग - प्रदीप रतन अहिरे,

तालुका प्रवर्ग - विनय शंकरराव जाधव, प्रवीण कृष्णा कांबळे, संदीप वाडीबा दराडे.

महिला प्रवर्गातून - श्रीमती सुमनताई संजय पाटील, संगीता अशोक ढिकले

सहकार पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण गट-सचिन अत्रे,अमित आडके,रवींद्र थेटे,रंजन थोरमिसे,नितीन पवार,चंद्रशेखर पाटील,सचिन पाटील, किशोर अहिरे, गणेश गायकवाड,नंदकिशोर सोनवणे,

इतर मागासवर्ग प्रवर्ग- विक्रम पिंगळे,

विमुक्त जाती जमाती प्रवर्ग-अनिल दराडे,

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग - मंगेश जगताप,महिला राखीव प्रतिनिधी गट(दोन जागा) अर्चना गांगोडे,सरिता पानसरे खैरे हे १५ उमेदवार निवडणुकीसाठी सहकार पॅनलतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.पॅनलचे नेतृत्व रवींद्र थेट, रविंद्र आंधळे व प्रमोद निरगुडे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com