एनडीएसटी सोसायटीसाठी आज जिल्ह्यात मतदान

एनडीएसटी सोसायटीसाठी आज जिल्ह्यात मतदान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

एनडीएसटी सोसायटीच्या (NDST Society) 21 जागांसाठी शनिवारी (दि.15) जिल्हाभरात 15 मतदान केंद्रांवर (polling station) मतदान (voting) होत आहे. 10 हजार 19 सभासद शिक्षक मतदार (Teacher voters) मतदानाचा हक्क बजावतील

एनडीएसटी निवडणुकीत (election) स्वतंत्र पॅनल देण्याची तयारी करणार्‍या काही उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेऊन शिक्षक (teacher) पत्नीला रिंगणात उतरवले. त्यामुळे टीडीएफचा पॅनल उभा राहता राहता कोलमडला असून केवळ 12 जागांवरच निवडणूक लढवत आहे.

ऐनवेळी साथ सोडणार्‍या उमेदवारांनी परिवर्तन पॅनलकडून उमेदवारी स्वीकारल्याने त्याचा फटका पॅनललाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशीत संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी एनडीएसटीची (NDST) लढाई चुरशीची होणार असून सभासद कोणाच्या हातात सत्ता याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com