निफाड नगरपंचायत 3 जागांसाठी आज मतदान

निफाड नगरपंचायत 3 जागांसाठी आज मतदान

निफाड । प्रतिनिधी Niphad

निफाड नगरपंचायतीच्या (niphad nagar panchayat) 3 प्रभागासाठी आज मंगळवार दि.18 रोजी मतदान (election) होत असून यासाठी 3227 मतदार (voter) मतदानाचा हक्क (Right to vote) बजावणार असून बुधवार दि.19 रोजी सर्व 17 प्रभागाची मतमोजणी होवून निकाल जाहिर होणार आहे.

निफाड नगरपंचायतीचे प्रभाग क्रं.3,10,13 हे इतर मागास प्रवर्ग साठी राखीव होते. मात्र सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) आदेशाने हे तीन ही प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया (Election process) राबविण्यात आली. परिणामी प्रभाग क्रंं.3 हा उगाव रोड वरील बरड वस्तीचा परिसर असून येथे आदिवासी बांधव (tribal community) वास्तव्यास आहे.

साहजिकच या प्रभागातून शिवसेना (shiv sena) नेते व नगरसेवक अनिल कुंदे (anil kunde) हे शिवसेनेच्या तिकिटावर नशिब अजमावित असून येथे राष्ट्रवादीकडून गोपाळ साहेबराव कापसे (Gopal Sahebrao Kapase) रणांगणात आहे. या प्रभागात 1340 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून आज मंगळवारी या प्रभागासाठी याच परिसरातील ज्ञानदिप इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये मतदान होत आहे.

तर प्रभाग क्रं.10 मध्ये माजी सरपंच तसेच निसाका (NISAKA) माजी संचालक व सोसायटीचे विद्यमान संचालक बापू कुंदे यांच्या अर्धांगिनी तथा निफाड खरेदी-विक्री संघाच्या संचालक सिंधूबाई कुंदे या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित असून त्यांचेसमोर धारराव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.कविता नितिन धारराव रणांगणात आहेत.

या प्रभागासाठी माणकेश्वर चौकातील जि.प. शाळेत मतदान होत असून येथे 955 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर प्रभाग क्रं.13 मध्ये नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा स्वाती बाळासाहेब गाजरे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नशिब अजमावित आहेत. तर त्यांचे विरोधात शिवसेना युवा नेते विक्रम रंधवे यांच्या अर्धांगिनी रुपाली रंधवे शिवसेनेच्या तिकीटावर उभ्या आहेत.

या प्रभागासाठी सरस्वती विद्यालयात मतदान होत असून येथे 932 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तिनही प्रभागात मातब्बर उमेद्वार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या तिनही प्रभागात चुरशीच्या लढती होत आहे. आज होणार्‍या मतदानानंतर लागलीच बुधवार दि.19 रोजी मतमोजणी होत असून निवडणूक विभागाने मतदानासह मतमोजणीची तयारी पूर्ण केली असल्याने इच्छुकांच्या निकालाकडे नजरा लागून आहे.

Related Stories

No stories found.