आदिवासी बहुल सुरगाण्यात मतदानाचा टक्का वाढणार

आदिवासी बहुल सुरगाण्यात मतदानाचा टक्का वाढणार

सुरगाणा | Surgana

सुरगाणा नगरपंचायत निवडणूक (Surgana Nagarpanchayat Election) रिंगणात उमेदवारी अर्ज (Application) दाखल केलेल्या 66 जणांपैकी केवळ 2 अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 64 उमेदवारांमध्ये लढतीस सकाळपासून सुरुवात झाली आहे...

दुसरी पंचवार्षिक निवडणूक असलेल्या सुरगाणा नगरपंचायतमध्ये प्रत्येक पक्षातील मातब्बरांसह जुन्या व नवख्या उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे. आज सकाळपासूनच सुरगाण्यातील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

सकाळच्या सत्रात सुरगाण्यातील ९ मतदान केंद्रांवर ३३.५० टक्के मतदान झाले आहे. नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात पहिल्या ६१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ३५६ पुरुष आणि २५९ महिलांनी मतदान केले. तर दुसऱ्या टप्प्यात यात ७३१ पुरुष आणि ६७८ महिलांनी मतदान केले आहे. आतापर्यंत एकूण १४०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com