पेठ : नागरिक बजावताय आपला हक्क; आतापर्यंत ‘इतके’ मतदान

पेठ : नागरिक बजावताय आपला हक्क; आतापर्यंत ‘इतके’ मतदान

पेठ | Peth

जिल्ह्यातील पेठ नगरपंचायतीसाठी आज (दि.२१) सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. पेठ नगर पंचायत निवडणूकीत (Peth Nagarpanchayat Election) १७ जागांसाठी ७२ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत...

एकूण ६ केंद्रांवर आतापर्यंत ३८.४२ टक्के मतदान झाले आहे. नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध केंद्रांवर तरुणांपासून वृद्धांपर्यंत नागरिक आपला हक्क बजावत असल्याचे दिसून येत आहे.

पेठ नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असतांना आज माघारीच्या शेवटच्या दिवशी केवळ १ उमेदवारानी माघार घेतल्याने ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १७ वार्डापैकी वार्ड क्रमांक ३, ६, १२ मध्ये प्रत्येकी ३ उमेदवार असून वार्ड क्रमांक १४ व १६ मध्ये प्रत्येकी ६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे निवडणूक पंचरंगीच होत आहे.

Related Stories

No stories found.