कळवण : मतदानासाठी नागरिकांचा उत्साह; केंद्राबाहेर रांगा

कळवण : मतदानासाठी नागरिकांचा उत्साह; केंद्राबाहेर रांगा

कळवण | Kalvan

कळवण (kalvan) नगरपंचायत निवडणुकीची (Nagar Panchayat elections) रणधुमाळी जोरात सुरु आहे. कळवण येथील नगरपंचायतीच्या 17 प्रभागांपैकी दोन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती असल्याने व प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार (Sunita Pagar) यांच्या बिनविरोध निवडीमुळे उर्वरित 14 प्रभागांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे...

आज सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. 14 पैकी 7 प्रभागांमध्ये महिलांच्या लढती रंगतदार ठरणार आहे. मतदानाच्या सर्व केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदाच्या कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीत निम्या लढतीत महिला उमेदवारांचा बोलबाला असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com