नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदान करण्यापूर्वी मतदारांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मतदान केंद्रांवर पथके नियुक्त होणार असून, पथकातील कर्मचारी मतदारांची आॅक्सीजन पातळी व तापमान यांची नोंद घेणार आहे.

मतदारास तापमान असल्यास, त्यास मतदान केंद्रात सोडले जाणार नाही.असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. बैठकीत ग्रामपंचायत निवडणूक तयारीचा आढावा झाला. करोना संकटात मतदान प्रक्रीया राबविली जात आहे.

करोनाचे संकट काहीसे कमी झालेले असले तरी, पूर्णपणे करोना संपुष्टात आलेला नाही. मतदानाच्या दिवशी केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीत करोनाचा फैलाव होऊ नये,यासाठी मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील दोन-दोन कर्मचाऱ्यांचे पथके तयार केली जाणार आहे. ही पथके मतदान केंद्रावर मतदानांसाठी येणाऱ्या मतदारांची तापमान मोजणी करून आॅक्सीजन लेव्हलची तपासणी करतील. या तपासणीत मतदारांस मतदारास ताप, आॅक्सीजन लेव्हल कमी असल्यास त्यास मतदान केंद्रात सोडले जाणार नाही.

संबंधित मतदारांस पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर पाठविले जाईल. मतदान केंद्रावर सॅनिटायझरचे ठेवले जाणार आहे. तसेच मतदारांना मास्क बंधनकारक करण्यात आलेले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आहेर यांनी याबाबतची असलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली.