प्रारुप मतदार यादी १५ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

प्रारुप मतदार यादी १५ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

नाशिक । Nashik

जिल्हा प्रशासनाकडून करोना संकटातही इतर कामकाज सुरु असून निवडणुक विभागाचे ऑनलाईन काम वेगाने सुरु आहे.

जिल्ह्याची २५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यानंतर आता जानेवारी २०२१ च्या आर्हता दिनांकावर आधारीत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याची यंत्रणेची तयारी सुरु झाली असून ती १५ नोव्हेंबरला केली जाणार आहे.

त्यामुळे १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांनीही आपले नाव त्वरीत मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

जानेवारी २०२० च्या आर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी यंत्रणेकडून प्रसिध्द झाली. त्यानुसार जिल्हयात आता ४५ लाख ९८ हजार ४५ एकुण मतदार आहेत. या मतदारांसोबतच आता १५ नोव्हेंबरला २० जानेवारी २०२१ च्या आर्हता दिनांकावर प्रारुप यादी जाहीर केली केली जाईल.

त्यामुळे मतदार अजूनही त्यासाठी नाव नोंदणी करु शकतात. कोरोनाचे संकट असले तरीही निवडणूक आयोगाने ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मतदारांना थेट मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा इतर कुठल्याह कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

ते घरुनच आपल्या मोबाईलवरुन निवडणूक विभागाच्या, संकेत स्थळावर जाऊन आपले नाव नोंदवू शकतात. १५ नोव्हेंबरपुर्वी आठ दिवस आधी त्यांना नाव नोंदविता येईल. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२० रोजी प्रारुप यादी प्रसिध्द होऊन, त्यावर दावे हरकती, सुनावणी होईल.

अंतिम निर्णय घेत मतदारांची नावे मंजूर केल्यानंतर लागलीच त्यांची अंतिम मतदार यादी ही २० जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com