९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी स्वयंसेवक सज्ज

९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी स्वयंसेवक सज्ज

नाशिक। प्रतिनिधी Nashik

९४ व्या अ. भा. साहित्य संमेलनानिमित्त 94th Marathi literary convention स्वयंसेवक Volunteers निवड, देखरेख व कार्यशाळा समितीच्यावतीने स्वयंसेवकांची बैठक कुसुमाग्रज नगरी Kusumagraj Nagari येथे झाली. या बैठकीची सुरुवात संमेलन गीताने झाली.

या बैठकीला भुजबळ नॉलेज सिटी येथील तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय तसेच भुजबळ ॲकॅडमी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच के के वाघ अभियांत्रिकी आणि मातोश्री महाविद्यालय येथील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी समिती उपप्रमुख भूषण काळे यांनी स्वयंसेवकांना संमेलनाच्या कार्यक्रम स्थळांची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती करून दिली.

ग्रंथदिंडीचे समिती प्रमुख विनायक रानडे व मंगेश पंचाक्षरी यांनी ग्रंथदिंडी नियोजनाविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.स्वयंसेवकांना वेळेचे नियोजन, टीम वर्क, संवाद कौशल्य याबाबत अभय बाग यांनी मार्गदर्शन केले.

समिती प्रमुख प्राचार्य डॉ. संतोष मोरे यांनी संमेलनासाठी काम करत असलेल्या इतर समित्यांची स्वयंसेवकांना माहिती करून दिली व साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असल्यामुळे मातृभाषेचे सेवक होण्याची सुवर्णसंधी असल्याचे स्वयंसेवकांना उत्साह व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी समिती पालक पेठे विद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश देशमुख, मेट महाविद्यालयाचा स्टाफ कॉर्डिनेटर अनिल गोसावी, विनोद टवलारकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी विष्णू बागुल व आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधी किरण पगार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com