शिक्षणाधिकार्‍यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज
USER

शिक्षणाधिकार्‍यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एकीकडे माध्यमिक शिक्षण विभागाला (Department of Secondary Education) पूर्णवेळ शिक्षणाधिकारी (Education Officer) नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेचे (Zilha Parishad) प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर (Primary Education Officer Rajiv Mhaskar) यांनी स्वेच्छानिवृत्तीकरिता (Voluntary retirement) शिक्षण आयुक्तांकडे (Commissioner of Education) अर्ज केला आहे. जून 2022 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या म्हसकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज (Application) करण्यामागील कारण काय ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव आपण सेच्छानिवृत्ती अर्ज (Retirement application) केल्याचे म्हसकर यांनी सांगितले. 35 वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिक्षण विभागात काम करत आहे. वयोमानानुसार आता पहिल्यासारखी धावपळ होत नाही. या कारणामुळे सेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार असल्याचे म्हसकर यांनी सांगितले. नाशिक जिल्हा (nashik district) परिषदेत यापूर्वी म्हसकर यांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यानंतर त्यांची विदर्भात बदली झाली होती.

तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर म्हसकर यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला. करोनाचा संसर्ग वाढत गेला आणि शिक्षण प्रक्रिया थांबली. या काळात म्हसकर यांनी ‘डोनेट अ बूक’ (Donate a book) या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना पुस्तके उपलब्ध करुन दिली.

‘डोनेट अ डिव्हाइस’ (Donate a device) या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (students) ऑनलाईन शिक्षणासाठी (Online education) जुने मोबाईल (Old mobile) वापरात आणले. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात पोषण आहार (Nutrition diet) शिजवणे शक्य नसल्याने शाळांमध्ये (schools) जावून शिक्षकांनी तांदूळ व कडधान्य पालकांना वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हसकर यांची सेवा जून 2022 मध्ये संपुष्टात येत असताना तत्पूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज का सादर केला, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिक्षण विभागामध्ये 35 वर्षांपासून आपण सेवा करत आहे. वैयक्तिक कारणामुळे शिक्षण आयुक्तांकडे स्वेच्छानिवृत्तीकरिता अर्ज केला आहे.हा अर्ज मंजूर झाला तर प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार लवकरच संपुष्टात येईल.

- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प., नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com