खादी ग्रामोद्योग केंद्रात विद्यापीठाची घोषणा हवेत
file photo

खादी ग्रामोद्योग केंद्रात विद्यापीठाची घोषणा हवेत

नाशिक | नरेंद्र जोशी

नाशिकच्या विकासात एचएएल. नोटप्रेस, औद्योगिक वसाहत, विमानतळ, रेल्वे स्टेशन, आर्टिलरी सेंंटर यांचे जेवढे योगदान आहे. तेवढेच त्र्यंबक विद्यामिंंदराच्या खादी ग्रामोद्योग केंद्राचेही आहे. शेकडो कोटींचा केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज अक्षरश: मसाले, पाव बिस्कीट, साबण उत्पादन शिकवण्यातच धन्यता मानत आहे. बाकी 250 एकर जागा धूळखात पडली आहे....

त्र्यंबकरोडवरील खादी ग्रामोद्योग केंद्रात विद्यापीठ उभारण्याची घोषणा खादी ग्राम उद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभा प्रसंगी केली होतीे. खासदार हेमंत गोडसे यांनी विद्यापीठाच्या प्रस्तावाचे स्वागत करत, खादी ग्रामोद्योगातील विद्यापीठाला केंद्राकडून पाठबळ देण्याची तयारी दाखविली होती.. यामुळे नाशिकमध्ये ग्रामोद्योग विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योजकांची फळी उभी करता येऊ शकेल असा विश्वासही गोडसे यांनी व्यक्त केला होता.

येत्या काळात खादी ग्रामोद्योग केंद्र आधुनिक तंत्रज्ञान व विचारांच्या बळावर पाऊले टाकणार असून यासाठी नाशिक जिल्ह्यातील 260 एकरवर असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्रात लवकरच विद्यापीठाची उभारण्यात येईल. त्यामाध्यमातून तालुका व ग्रामीण भागात खादी ग्राम उद्योग केंद्रांचे कोर्सेस घेण्यासाठी प्रयत्न सुरू होतील असे प्रत्येकाल वाटले होते. मात्र त्यानतर दोन वर्ष करोनात गेले. घोषणा हवेत विरली.

आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे या खात्याची सूत्रे आली आहे. महाराष्टाचे एकमोठे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. त्यांनी ठरविले तर ते या विद्यापीठाचा कायापालट करु शकतात. त्यासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधींंनी त्यांचे लक्ष्य वेधणे गरजेच आहे. साधारण 1962 च्या काळात भारतात उद्योगांची भरभराट व्हावी व कुशल कारागीर तयार व्हावे.

या उद्देशानेे खादी ग्रामउद्योगाची स्थापना करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग विद्यालय हे नाव साधारण 25 वर्षापूर्वी देण्यात आले. या आधी उद्योजक बिर्ला यांचेच वर्चस्व होते, त्यामुळे तेथील बसस्टँडला बिर्ला स्टॉप म्हटले जायचे. आज त्रंबक विद्यामंदिर म्हणतात. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम येथे 300 एकरवर चालतात.

तेल घाणा, बेकरी,साबण उद्योग, खादी कपडे, मसाले उद्योग, शिवणकाम अशा प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण येथे दिले जाते. पण आता बरेच बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. 2004 साली खाकी हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण नैरोली पोलिस ठाणे म्हणून या ठिकाणी झाले होतेे. अक्षय कुमार, ऐश्वर्या राँय, अमिताभ बच्चन, तुषार कपूर अशी सिनेमंडळी तेव्हा लोकांनी पाहिली होती.

1962च्या आसपास जेव्हा प्रशिक्षणाला सुरुवात झाली तेव्हा तिथे अलेल्या प्रिंसिपाँल यांना शेतकीची अवजारे वासाळीगावचे प्रगतशील शेतकरी नारायण पाटील यांच्याकडून त्यांना मिळायची

विद्यामंदिरमध्ये बाहेरुन नोकरीसाठी आलेल्या लोकांना राहण्यासाठी मोठमोठे घरं व प्रशिक्षणासाठी मोठमोठी सदन बांधण्यात आलीे. आज फक्त बेकरी व मसाले हे दोनच प्रशिक्षण केंद्र दिसत आहे .मोठमोठ्या वास्तु पडक्या खोल्या वाढलेले जंगल, विरळ झालेली लोकवस्ती यामुळे ह्या ठिकाणी बिबटे दिसतात. तसेच मोठमोठी फळबाग या ठिकाणी आहे फळे खान्यासाठी कोणी नसल्यामुळे नैसर्गिक पध्दतीने पिकून जमिनीवर पडतांत. लोक बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली जगतात. नाशिकच्या विकासासाठी येथे मोठा प्रकल्प आणवा.स्थानिकांना रोजगार मिळावा. यासाठी खासदारांनी केंद्रात प्रयत्न करावे अशी मागणी वासाळीगावचे सामाजिक नेते शांताराम पा.चव्हाण सातत्यानेे करत आहेत. अनेक साबणाच्या फँक्टरी व बेकरी उभ्या करण्यात या केंद्राचे योगादन आहे. हा परिसर चित्रपटनगरी पेक्षा कमी नाही, असा प्रकल्प बंद पडू नये. यासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com