विवेकानंदांचे विचार युवकांना प्रेरक : कदम

करंजगावला विकासकामे शुभारंभ
विवेकानंदांचे विचार युवकांना प्रेरक : कदम

करंजगाव । वार्ताहर Karanjgaon-Niphad

संपूर्ण जगाला विश्व बंधुत्वाचा संदेश (message of world brotherhood) देणार्‍या स्वामी विवेकानंदांचा (Swami Vivekanand) जीवनपट युवाशक्तीला प्रेरणादायी आहे. करंजगावच्या (Karanjgaon) स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत भविष्यात गोदाकाठचे चांगले प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील. युवकांनी (youth) स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम (Former MLA Anil Kadam) यांनी केले आहे.

करंजगाव येथे माजी सरपंच खंडू बोडके यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण व पं.स. सदस्या कमल राजोळे यांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभाप्रसंगी कदम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पावशे होते. याप्रसंगी बाजार समिती मा. संचालक गोकूळ गिते, बाळासाहेब जाधव, पं.स. सदस्य कमल राजोळे, शिवा सुरासे, शंकर संगमनेरे, सरपंच प्रज्ञा निरभवणे, औरंगपूर सरपंच भगवान चव्हाण, आरिफ इनामदार, रंगनाथ सातपुते,

रामदास खालकर, भुसे सरपंच बेंडकोळी, भाऊसाहेब खालकर, उपसरपंच कुसूम राजोळे, गटनेते रावसाहेब राजोळे, ग्रा.पं. सदस्य नामदेव पवार, बाळासाहेब कोटकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुनीता राजोळे, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब पवार, विलास राजोळे, वासुदेव जाधव, रामदास राजोळे, दत्तू भुसारे, पुंजा भगूरे, रोहिदास कामडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते.

पं.स. सदस्या कमल राजोळे यांच्या निधीतून स्मशानभूमी दुरुस्ती, भुसे येथे भूमिगत गटार, म्हाळसाकोरे येथे शाळेचे कंपाउंड, भेंडाळी येथे भूमिगत गटार, औरंगपूर येथे पाण्याची टाकी व पाईपलाईन या कामांचे उद्घाटन अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. करंजगाव आरोग्य उपकेंद्राच्या सर्व कर्मचारी व अंगणवाडी सेविकांचा करोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

चैतन्य सुरेश राजोळे यांची युवासेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल जगदीश पवार, स्वाती लाड, रोशन खालकर, प्रतीक खालकर यांचा व पत्रकार बाजीराव कमानकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. करंजगावच्या बोट क्लबच्या ऋतुजा जोगदंड,

अंकिता राजोळे, वैष्णवी राजोळे, समृद्धी चव्हाण, मयूर लोहकरे, सुयोग भगूरे, प्रेम राजोळे, करण आघाव, अंकुश इंधे, मोहन पवार, विशाल डेर्ले, संतोष इंधे आदी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण राजोळे, शहाजी राजोळे, राहूल पवार, विवेक बर्वे, सागर जाधव, नंदू निरभवणे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, योगेश बोराडे, संदीप गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com