विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा

विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा

वावी । वार्ताहर Vavi-Sinnar

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त (Shri Sant Sena Maharaj Punyatithi Utsava) संत सेना महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (The prestige of the idol of Vitthal Rukmini) सोहळा उत्साहात संपन्न झाला.

संत सेना महाराज मंदिर (Sant Sena Maharaj Temple) कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रवचन, हरीपाठ, संगीत भजन, किर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिंदे गुरूजी यांचे प्रवचन, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम, तसेच महाराष्ट्रातील नामवंत गायक, वादक, कलाकार गायनाचार्य संगीतरत्न भगूरे गुरुजी, प्रकाश महाराज कातकाडे, मृदूंगमणी भरत महाराज पठाडे, तालमणी दिनेश महाराज मोजाड यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.

संत सेना महाराज मंदीर हे सखाराम बापू जाधव यांनी स्वखर्चाने बांधले आहे. यांच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे सकाळी हरी किर्तन झाले. मंदिराचे कलशारोहण तपोनिधी जनार्दन स्वामींचे शिष्य भोलेगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. मूर्ती स्थापना होऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष किरण बिडवे, सलून असोसिएशन जिल्हा अध्यक्ष एकनाथ शिंदे, इगतपुरी सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, अ‍ॅड. सुनिल कोरडे, जिल्हा संघटक अशोक सूर्यवंशी, सचिव किरण कडवे, घोटी ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ कडवे, वैभव कोरडे, गणेश रायकर,

लक्ष्मण सोनवणे, मनोज बिडवे, दिलीप जाधव, संदीप व्यवहारे, वाल्मिक शिंदे, जनार्दन यादव, संजय पंडित, बाळासाहेब वाघ, अमोल शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंबादास कदम, मधूकर वाघ, अशोक तूपे, रमेश बिडवे, बाळासाहेब साळूंके, संतोष कदम, संदीप जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com