विठामाई योग निसर्गोपचार कॉलेजतर्फे मोफत कार्यशाळा...

विठामाई योग निसर्गोपचार कॉलेजतर्फे मोफत कार्यशाळा...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोविड काळात मनुष्य भीतीदायक वातावरणात जगत आहे. मात्र न घाबरता योग्य प्राण विद्येची हिलींग टेक्निक आत्मसात केल्यास ही विद्या एक उत्तम दीर्घारोग्याची गुरुकिल्ली म्हणून जीवनात नवचैतन्य आणेल, असे प्रतिपादन नामांकित हिलर व ट्रेनर पूजा लढ्ढा (Pooja Laddha)यांनी केले...

विठामाई योग निसर्गोपचार कॉलेज व पर्सनल हिलींग हब (पीएचएच) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क हिलींग ऑनलाईन वेबिनरच्या समारोहा प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीएचएच चे कार्याध्यक्ष राजेश मंडोरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विठामाई कॉलेजच्या डायरेक्टर डॉ. वर्षा पगार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

ट्रेनर लढ्ढा यांनी आपल्या अनोख्या शैलीने हिलींगची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय भाषणात मंडोरे यांनी हिलींग ही काळाची गरज असल्याचे सांगून, रमनाश्रमच्या कार्याची महती सांगितली. विठाबाई कॉलेजच्या प्राचार्या शकुंतला पाटील यांनी हिलींग चे अनुभव सांगतांना उपस्थितांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com