विटभट्टी राखेमुळे आरोग्य धोक्यात

धुळीमुळे शेतीविर विपरित परिणाम; उत्पादनात घट
विटभट्टी राखेमुळे आरोग्य धोक्यात

निफाड। प्रतिनिधी Niphad

शिंगवे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणातील असलेल्या विटभट्टयांची राख गावात उडून नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात येत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना (students) देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून वार्‍यामुळे उडणारी राख (Ashes) ऊस (Cane), कांदा (onion), द्राक्षे (Grapes), भाजीपाला (Vegetables) आदी पिकांवर बसून पिकावर विपरित परिणाम होण्याबरोबरच उत्पादनात देखील घट होत आहे.

ग्रामसभेने विटभट्टी बंद करण्याचा ठराव करून देखील अद्यापपर्यंत त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. तसेच संबंधित अधिकार्‍यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन (memorandam) देवूनही महसूल विभाग (Department of Revenue) बघ्याची भूमिका निभावत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायखेडा बाजारपेठेपासून 5 कि.मी. अंतरावर व गोदावरी (Goadvari river) नदीकाठावर वसलेल्या शिंगवे गावातील शेतकर्‍यांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो.

त्यातच आता गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विटभट्टया उभ्या ठाकल्याने या विटभट्टीसाठी एकलहरे औष्णिक वीज केंद्रातून (Thermal power station) मोठ्या प्रमाणात राख आणली जाते. विटासाठी लागणारी माती व ही राख वार्‍यामुळे उडून ती संपूर्ण गावात पसरते. तसेच विटभट्टीसाठी लागणारी माती काढण्यासाठी नदीकाठावर मोठ-मोठे खड्डे तयार झाले आहे.

याच परिसरात पक्षी अभयारण्य (Bird Sanctuary) असून या उडणार्‍या धुळीचा पक्षांना त्रास होत असतांनाही वनविभाग (Forest Department) मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. विटभट्टी परिसरात शाळा (shcool) असल्याने उडणार्‍या राखेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विटभट्टीसाठी मोठ्या प्रमाणात गौण उत्खनन होत असतांना देखील महसूल विभाग बघ्याची भूमिका निभावत आहे.

उन्हाळा (Summer), पावसाळा (Rainy season), हिवाळा (winter) अशा तीनही ऋतूत नागरिकांना या राखेच्या प्रादूर्भावाचा सामना करावा लागत आहे. गावाजवळच मोठ्या प्रमाणात असणार्‍या या विटभट्टयांची राख गावात उडते. तसेच हीच राख पिकांवर देखील बसत असून पिकांची वाढ खुंटणे, फळांवर विपरित परिणाम होणे असे असे प्रकार वाढीस लागले असल्याने गाव परिसरातील या विटभट्टया बंद करण्यात याव्यात असा ठराव शिंगवे ग्रामस्थांनी ग्रामसभेवर मंजूर करून घेतला होता.

संबंधित अधिकार्‍यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत त्यावर काहीएक कार्यवाही झाली नसल्याने आणखी किती काळ नागरिकांना या राखेच्या प्रादूर्भावाचा सामना करावा लागणार असा प्रश्न शिंगवे ग्रामस्थांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com