नाशिक । Nashik

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनातर्फे निर्बंध लावण्यात आल्याने यंदाची महाशिवरात्री देखील भाविकांना घरीच साजरी करावी लागणार आहे. नाशिक शहरात असलेली घरातील प्राचीन मंदिरांचे दर्शन दैनिक देशदूत तर्फे करण्यात येत आहे.

नाशिक मधील कृष्णेश्वर महादेव मंदिर पोळवाडा बालाजीकोट याठिकाणी असून १८५६ सालात त्याची स्थापना करण्यात आली. गेल्या तीन पिढ्यांपासून आता मंगेश वैद्य यांची चौथी पिढी या मंदिरात सेवा करीत आहेत.

दिल्ली दरवाजा येथील मृगव्यागेश्वर मंदिराला रामायणाचा इतिहासामुळे असे नाव पडले १७०० च्या दशकापासून गणेश साने यांची हि पाचवी पिढी मंदिराची सेवा करीत आहेत. दिल्ली दरवाजा येथीलच १०० वर्षांपूर्वीचे सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे उंदीरवाडकर हे मनोभावी सेवा करीत आहेत.

गंगातिरी मोदकेश्वर मंदिरा जवळ असलेल्या काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचा सुमारे ३५० ते ४०० वर्षांचा इतिहास असून ज्योती गाडे ह्या सेवा करीत आहेत

सुमारे ४०० ते ५०० वर्षांचा ईतिहास लाभलेले भटजी महाराज समाधी मंदिर हे एकमुखी दत्तमहाराज मंदिराच्या मागील बाजूस आहे. सुमारे १७०० च्या दशकात या मंदिरात घंटा बांधण्यात आली असून सुनंदन जानेराव हे मनोभावी सेवा करीत आहेत.

दिल्लीदरवाजा येथील जंगम वाड्यातील कर्पुरेश्वर महादेव मंदिर हे १६०० ते १७०० च्या दशकापासुन असून आशुतोष जंगम हे भोलेनाथाची मनोभावे सेवा करीत आहेत.