त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

जानेवारी उगवताच वारकरी भाविकांना संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध लागले आहेत. ०७ फेब्रुवारीला येथे संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा आहे. यंदा कोविडमुळे संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा भरेल की नाही याविषयी भाविकांमध्ये चर्चा सुरू आहे.

दि. 6 ते 8 फेब्रुवारी असा तीन दिवस यात्रा कालावधी आहे. दरवर्षी या यात्रेला पाचशे दिंड्या व चार लाख भाविक येतात. त्यादृष्टीनेे शेवटचे आठ दिवस यात्रा पूर्वतयारी शासन यंत्रणेला करावी लागते. तर दिंडीचालकांना दिंड्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे लागते. पायी दिंड्या अगोदर निघतात. संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्त मंडळाने संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेबाबत पत्र देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे.

दरवर्षी शासनाला यात्रा पर्वकाळ महिनाभर अगोदर कळवला जातो. सातशे वर्षांपासून ही यात्रा भरत आहे. शासनच्या निर्णयाची आता नागरिक प्रतीक्षा करत आहेत. १९८० च्या कुंभमेळा पर्वकाळात कॉलरा प्रतिबंधक लस त्र्यंबकेश्वर बसस्थानकात ठेवण्यात आली होती. शाळांमधून ही लस इंजेक्शनपूर्वी दिली जात होती.

हरिद्वार येथील पौष मेळाच्या धर्तीवर शासनाने वारकरी, भाविकांची नोंदणी करावी, गरज पडल्यास अल्पदरात कोवड चाचणी करावी व परिस्थिती पाहून शेवटच्या टप्प्यात उशिरा गाईडलाईन जारी कराव्यात, अशा सूचना 1980 च्या कुंभमेळ्यातील नागरिकांनी केल्या आहेत.