रानभाजी महोत्सवास खा.डॉ. पवार यांची भेट
नाशिक

रानभाजी महोत्सवास खा.डॉ. पवार यांची भेट

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये उगवणाऱ्या पारंपरिक रानभाज्या ह्या शहरातील नागरिकांपर्यंत माहित व्हाव्यात, म्हणून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी पाड्यांवरून अनेक आदिवासी शेतकरी विविध दुर्मिळ अशा रानभाज्यांचे प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे प्रदर्शन लावण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवास खा.डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन अधिक नवनवीन दुर्मिळ भाज्यांची माहिती करून घेतली.

याप्रसंगी बोलतांना खा.पवार म्हणाल्या, "आदिवासी समाज हा डोंगरदऱ्यांमध्ये वस्ती करून राहतो. तिथे उगवणाऱ्या रानभाज्याच त्यांच्या अन्नाचा प्रमुख मार्ग असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषणद्रव्ये, प्रथिने व जिवंसत्व असल्याने त्याचा मोठा फायदा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो."

निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो आणि ते आपल्याला घेता आले पाहिजे. म्हणूनच ह्या महोत्सवात प्रदर्शित केलेल्या रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा, असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com