नाशिक । Nashik

दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन महिलांच्या तक्रारीसंदर्भात आढावा घेतला.

यावेळी महिला तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काय धोरण अनुसरावे याची माहिती त्यांनी दिली. त्रासलेल्या महिलेला समजावून घेणे अपेक्षीत असल्याचे स्पष्ट करीत देवी यांनी सायबर क्राईमबाबत जनजागृती, भरोसा सेलची व्यापक प्रसिद्धी, जनतेशी पोलिसांचे सलोख्याचे संबंध असावेत, अशा सुचना त्यांनी केली.

शहरात महिला तक्रारींचा निपटरा व्यवस्थीत होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस आयुक्त पांडे यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी हजर होते.