स्वा.सावरकर स्मारकास जिल्हाधिकार्‍यांची भेट

स्वा.सावरकर स्मारकास जिल्हाधिकार्‍यांची भेट

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतिकारकांच्या स्मारक किंवा जन्मभूमीत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाबाबतची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी डी.गंगाथरण (Collector D.Gangatharan) यांनी भगूर येथील स्वा.सावरकर स्मारकात ( Veer Savarkar Memorials ) भेट देत पाहणी केली.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे आपापल्या भागातील स्वातंत्र्यवीरांच्या जन्मस्थळास अथवा स्मारकास भेट देऊन उपक्रमाची माहिती घेत आहेत या पार्श्वभूमीवर गंगाधरण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकास भेट दिली.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात स्मारकाची माहिती घेतली.

यावेळी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, पालिका अधीक्षक रमेश राठोड, अभियंता रमेश कांगणे, स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर,सहाय्यक व्यवस्थापक भूषण कापसे, तुषार कुंडारीया आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com