नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विश्वास ठाकूर

उपाध्यक्षपदी दत्तात्रय गडाख, कार्याध्यक्षपदी राजेंद्र सुर्यवंशी
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विश्वास ठाकूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकच्या अध्यक्षपदी विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे...

कार्याध्यक्षपदी देवळा मर्चंट्स को-ऑप. बँकेचे संचालक राजेंद्र सुर्यवंशी (Rajendra Suryawanshi) यांची तर उपाध्यक्षपदी सरस्वती को-ऑप.बँक ओझरचे संचालक दत्तात्रय गडाख (Dattatray Gadakh) यांची निवड करण्यात आली.

ही नेमणूक मनिषा खैरनार (Manisha Khairnar) अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (1) अधिन-जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँक असोसिएशनच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली.

विश्वास ठाकूर यांना गेल्या 24 वर्षात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यात विश्वास बँकेला 13 राष्ट्रीय, 21 राज्यस्तरीय, 9 जिल्हास्तरीय असे एकूण 43 पुरस्कार व विश्वास ठाकूर यांना 3 राष्ट्रीय, 18 राज्यस्तरीय, 24 जिल्हास्तरीय असे एकूण 45 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विश्वास ठाकूर यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक अजय ब्रह्मेचा, नानासाहेब सोनवणे, संजय वडनेरे, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, यशवंत अमृतकर, भरत पोफळे, डॉ.शशीताई अहिरे, वसंतराव खैरनार, मिर्झा सलीम बेग, रविंद्र गोठी, अलीमुद्दीन वाहिद, व्यवस्थापक रामलाल सानप आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com