विश्वास को-ऑप.बँकेची समाजाभिमुख उपक्रमाशी बांधिलकी कौतुकास्पद: सहकार आयुक्त कवडे

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जनसामान्यांचे आर्थिक सबलीकरण (Economic Empowerment) होण्यासाठी विश्वास को-ऑप.बँकेने (Vishwas Co-op.Bank) सहकारात मोठे योगदान दिले आहे. बदलत्या काळानुसार बँकेने आधुनिक बदल (Modern change) स्विकारले आहेेत, हे निश्चितच अभिनंदनीय आहे.

विश्वास बँकेप्रमाणे इतर बँकांनीही बदलत्या काळानुरूप बदल स्विकारावे त्यामुळे सहकाराक्षेत्राचा प्रगतीचा वेग वाढेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे (Maharashtra Cooperative Commissioner and Registrar Anil Kawade) (आयएएस) यांनी केले. विश्वास को-ऑप. बँकेने (Vishwas Co-op.Bank) अर्थकारणाबरोबरच विविध साहित्य संस्कृती व समाजाभिमुख विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांशी सहकाराच्या माध्यमातून नाळ जोडली असून त्याचा उपयोग सर्वसामान्यांना सहकाराच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढचं पाऊल आहे.

तसेच बँकेची आर्थिक वाटचाल उत्तम असून बँक गौरवशाली वाटचाल करत आहे. दिवसेंदिवस बँक घेत असलेली उत्तुंग झेप बँकींग क्षेत्रातल्या (Banking sector) आधुनिक सुधारणांचे दर्शन घडविणारी असल्याचे सहकार आयुक्त कवडे यांनी केले. विश्वास को-ऑप. बँकेस अनिल कवडे यांनी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ.सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक हे देखील उपस्थित होते.

अनिल कवडे यांनी सहकार क्षेत्राच्या बदलत्या ध्येय-धोरणांविषयी प्रगतीशील वाटचालीचा आढावा घेतला. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, इन्स्पेक्शन रेटिंग, नागरी सहकारी बँकांची स्वायत्तता, ऑडीटर नेमणूक आणि विषयांवरही मार्गदर्शन केले. कासा, क्यूआर कोड, जीइएम सुविधा तसेच अवयवदान, घनकचरा व्यवस्थापन नियोजनासंदर्भात समाजात जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भेटीदरम्यान बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँकेच्या 25 वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग, ‘मिशन 2030’ या ध्येयपूर्ण लक्ष्य असलेल्या उपक्रमाबरोबरच आजवर मिळालेले पुरस्कारांबरोबरच रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली.

याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, जनसंपर्क संचालक घन:शाम येवला, संचालक अजित मोडक, डॉ.वासुदेव भेंडे, डॉ.चंद्रकांत संकलेचा, मंगला कमोद, कैलास पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा.डॉ.प्रशांत पाटील, अ‍ॅड.दत्तप्रसाद निकम, मार्गदर्शक डॉ.कैलास कमोद, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील,

सह मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बागुल, उपमहाप्रबंधक सुरेश वाघ, महेंद्र पवार, सहायक महाप्रबंधक जितेंद्र निळकंठ तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी माठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com