कौमार्य चाचणी प्रकरण : महिला आयोगाने मागवला अहवाल

कौमार्य चाचणी प्रकरण : महिला आयोगाने मागवला अहवाल

नाशिक । ,प्रतिनिधी Nashik

एका समाजातील प्रथेप्रमाणे जात पंचायतीच्या सांगण्यानुसार उच्च शिक्षित वधू वरांच्या लग्नात वधुची कौमार्य चाचणी Virginity test केली जाणार असल्याच्या बातम्या होत्या. त्याची राज्याच्या महिला आयोगाच्या State Women's Commission अध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी याबाबत दखल घेत जिल्हा पोलिसांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आले.

दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्टीट करत माहिती दिली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका रिसॅार्टमध्ये डॅाक्टर वधूच्या कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याबाबत महिला आयोगाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मंगळवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत कलम 10 (1) (फ) (एक) व (दोन) नुसार या तक्रारीची दखल घेतली आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करणारा सद्यःस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत उपसचिव दिया ठाकूर यांनी पत्र पोलिसांना दिले आहे.

या तक्रारीनंतर बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. समाजमाध्यमांवर देखील विविध पोस्ट फिरत होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ पार पडला. अशा कुठल्याही स्वरूपाच्या प्रथा राबविल्या जात नसल्याचा जबाब वधू-वर पक्षातर्फे दिला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली होती.

रविवारी हा लग्न सोहळा झाला. ग्रामीण पोलीस कर्मचार्‍यांना माहिती मिळताच त्यांनी हॉटेलला नोटीस दिली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या विवाहात असा कोणताही प्रकार झाला नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षानी याबाबत अहवाल मागविला आहे. लवकरच अहवाल पाठविण्यात येईल.

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक Sachin Patil, Superintendent of Police

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com