
नाशिक | प्रतिनिधी
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात केलेली ४० टक्के वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी असून ही दरवाढ त्वरित मागे घेऊन कांदा उत्पादकांना त्वरित दिलासा द्यावा. तसे न झाल्यास शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा या पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
कधी कांदा आयात करून तर कधी निर्यात शुल्क वाढवून शेतकऱ्यांच्या हातातील दोन पैसे काढून घेण्याचे धोरण केंद्र सरकारतर्फे आखले जाते.भाव पडले तर सरकार नाफेडमार्फत माल खरेदी खरेदी करण्याची टाळटाळ करते.कांद्याला हमीभाव ठरवून द्या ही मागणीही मान्य करण्याचे टाळले जाते,असे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने कांदा निर्यात शुल्कात केलेली अवाजवी अशी ४० टक्के वाढ त्वरित मागे घ्यावी.तसे न केल्यास मोदी सरकारच्या या निर्दयी भुमिका विरोधात शिवसेना ठाकरे गटाला आपल्या स्टाईलने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र रास्ता रोको व धरणे तसेच तीव्र आंदोलन करावे लागेल व त्यास त्यास सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोदं घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देताना शिवसेना ठाकरे गराचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे सचिन मराठे, युवासेना ग्रा.जि.आधिकारी राहूल ताजनपूरे, नाशिक तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के
मध्य विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, शैलेस सुर्यवंशी, महानगर समन्वयक नितीन चिडे, विधानसभा समन्वयक सचिन बांडे, शिवसेना पदाधिकारी निलेश सांळूके, सुनिल जाधव, चंद्रकांत गोडसे, योगेश देशमुख, मसूद जिलानी, गोकुळ निगळ, भैय्या मणियार, ऋषि वर्मा, पप्पू टिळे, गोरख वाघ, नाना पाटील, अजय काकडे, रामू पवार, संपत जाधव, योगेश गांधी, सुदाम कोंबाडे, किरण शिंदे, प्रविण चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.