नाशिक | Nashik

युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर श्वानांच्या गळ्यात राणे नावाच्या पाटया टाकत जोरदार आंदोलन केले.

या श्वानांना भाजप कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलन रोखल्याने पुढिल वाद टळला.

युवासेना नेते वरुण देसाई यांच्यावर राणे पुत्रांनी पत्रकार परिषद घेत खंडणी वसूलीचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसैनिक व राणे यांच्यातील वाद पुन्हा चिघळला असून नाशिकमध्ये त्याचे पडसाद पहायला मिळाले.

शिवसैनिकांनी नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश व निलेश यांच्या विरोधात भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर बजोरदार घोषणाबाजी केली.

दोन जर्मन शेफर्ड श्वानांच्या गळ्यात निलेश व नितेश नावाच्या पाटया टाकत राणेंविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांनी त्यांना रोखल्याने शिवसैनिकांनी कार्यालय जवळील गल्लीत आंदोलन केले.