अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार ; आरोपी जेरबंद

अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार ; आरोपी जेरबंद

पेठ | प्रतिनिधी Peth

पेठ तालुक्यातील Peth Taluka म्हसगण आश्रमशाळेतील Mhasgan Aashramschool अल्पवयीन विद्यार्थीनी शाळा सुटल्या नंतर घरी परतत असतांना त्याच गावातील एकाने अत्याचार तर एकाने अपराधास सहकार्य केलेचा प्रकार घडला असुन पिडीतेच्या तक्रारी वरुण पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

या बाबतचे वृत् असे की म्हसगण शाळेत शिकत असलेली पिडीता सायकाळी पायी घरी जात असतांना निवृत्ती विठ्ठल जाधव रा . काकडपाडा व भास्कर माधव जाधव रा . वखारपाडा यांनी मोटर सायकलने पिडीतेचा पाठलाग करून म्हसगण - वखारपाड्याच्या पायवाटेवर आरोपी क्र . १ याने अत्याचार केला.

तर आरोपी क्र . 2 याने अत्याचारास सहकार्य केल्याची फिर्याद दाखल केले नंतर भादवि कलम ३७६ व बालकांचे लैंगीक अत्याचार पासून संरक्षण २०१२ चे कलम ४ ,८ , १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि . एस डी . वसावे करीत आहेत .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com