विद्यार्थीनीवर अत्त्याचार; शिक्षक-शिक्षिकेस अटक

विद्यार्थीनीवर अत्त्याचार; शिक्षक-शिक्षिकेस अटक

नामपूर | प्रतिनिधी | Nampur

अल्पवयीन मुलीस मारहाण (Beating a minor girl) व लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याप्रकरणी जि.प. शाळेतील (Z.P. School) शिक्षक (teachers) - शिक्षिकेविरुध्द जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaikheda Police Station) पोक्सो (Poxo) व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने जायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Complaint filed) केली आली आहे. नामपूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School) शिक्षण (Education) घेणार्‍या अल्पवयीन मुलीस वंदना भिवसन ठाकरे (52) या शिक्षिकेने शाळेच्या कार्यालयात मारहाण केली.

यावेळी उपस्थित दिलीप विनायक शिरापुरे (57) या शिक्षकाने मुलीच्या अंगावरील गणवेष काढत मोबाईलमध्ये (mobile) आक्षेपार्ह छायाचित्र (Offensive photograph) काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यासह संबंधितांना अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी हे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com