
नाशिक | प्रतिनिधी Nashik
पोलीस आयुक्त दिपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey )यांनी रंगपंचमीसाठी ( Rangpanchami ) काढलेल्या अध्यादेशाचे उल्लंघन करत लाऊडस्पीकर ( Loudspeakars ) वापर केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आयुक्तालयाच्या विशेष शाखेने रंगपंचमी निमित्त बालाजी युवक मंडळ, प्रेरणा मित्र मंडळ, सत्यम मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ व शिवसेना युवक मित्र मंडळ या पाच मित्र मंडळांना काही अटी व शर्थींच्या अधीन राहून परवानगी दिली हाेती. त्यात मिरवणूक काढू नये, डीजे व लाऊडस्पिकर वाजवू नये, पारंपारिक वाद्ये वाजवावीत, अशा स्पष्ट सूचना परवानगीत देण्यात आल्या होत्या.
मात्र, रंगपंचमीला या पाचही मंडळानी लाऊडस्पिकरवर बँन्जाे लावून उत्सव साजरा केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात ( Bhadrakali Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.