द्राक्षबागांना पावसाचा फटका

द्राक्षबागांना पावसाचा फटका

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

मान्सूनच्या (monsoon) माघारीमुळे तालुक्यातील कसबे सुकेणे (Kasbe Sukene) येथे सलग तीन ते चार दिवस पडलेल्या संततधारेमुळे (heavy rain) परिसरातील द्राक्षबागांना (vineyards) मोठा निर्माण झाला असून शेतकरी (farmers) परतीच्या पावसापुढे हतबल ठरला आहे.

सुकेणे परिसरातील द्राक्षबागा फ्लोरिंग (Flooring) मध्ये व दोड्यातील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसला. या पावसाचे पाणी द्राक्षघडांमध्ये साचल्याने प्रत्येक वेळी द्राक्षबागेत फवारणी करणे शेतकर्‍यांना शक्य न झाल्याने द्राक्षघडांची घडकूज मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच सततचे ढगाळ हवामान (cloudy weather) यामुळे डावनी रोगाचा मोठ्या प्रादूर्भाव वाढला आहे.

द्राक्षांबरोबरच कांदा उत्पादक (onion grower) शेतकर्‍यांनी कांद्याची महागडी बियाणे टाकली असून अत्यंत कोवळ्या स्थितीत ही रोपे असल्याने त्यांचेही नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. टोमॅटो उत्पादक (Tomato grower) शेतकर्‍यांचे ही मोठे नुकसान यापूर्वीच झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकासाठी (rabbi crop) फायदेशीर असला तरी द्राक्ष शेतीचे व इतर पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले. अद्यापही मका, सोयाबीन, भाजीपाल्यासारखी पिके पाण्यातच असून अति पाण्यामुळे ही पिके सडून गेली आहे.

मागील दोन वर्ष करोना प्रादूर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागून आर्थिक फटका सहन करावा लागला. आता सुरवातीला सुस्थितीत असलेल्या द्राक्षबागा मात्र कमी दाबाच्या पट्टयामुळे धोकादायक स्थितीत असून अद्यापही हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने पाऊस म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना धडकी भरवणारा ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com