द्राक्षबाग ऑक्टोबर छाटणीस प्रारंभ

द्राक्षबाग ऑक्टोबर छाटणीस प्रारंभ

शिरवाडे वणी। वार्ताहर Shirvade Vani- Sinnar

द्राक्षाच्या (Grapes) गोड तथा ऑक्टोबर (October) छाटणीस प्रारंभ झाला असून द्राक्षवेलींना खतांच्या मात्रा देऊन जमिनीतील बुरशीचा (Fungus) नायनाट करणे, कीटकनाशक फवारणी (Pesticide spraying) करणे या छाटणी पूर्व कामांना वेग आला असून टोमॅटो (Tomato) व सोयाबीन (Soybeans) काढणी तसेच पावसामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.

यावर्षी भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान झाले असून उर्वरित भाजीपाल्याला (Vegetables) योग्य भाव न मिळाल्यामुळे आता द्राक्ष पिकाकडे शेतकरी (Farmers) वर्गाचे लक्ष केंद्रित झाले आहे. द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी चांगलीच कंबर कसली आहे. प्रामुख्याने द्राक्षाचे पीक (Grape crop) हे नगदी पीक म्हणून ओळखले जात असून परकीय चलन मिळवून देणारे पीक आहे.

परंतु गेल्या पाच ते सात वर्षांपासून निसर्गाचा असमतोलपणा, बाजारभावातील चढ-उतार, बदलते हवामान यामुळे ते पीक आता बेभरवशाचे बनले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गुजरात (Gujrat) मधून डांग, पेठ, सुरगाणा, कनाशी या विशिष्ट भागांतून द्राक्ष बागांच्या कामासाठी शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहे.

मागील वर्षीच्या हंगामात करोना (Corona) रोगाच्या पार्श्वभूमीवर द्राक्षाला कमी अधिक भाव मिळाल्यामुळे काही द्राक्ष उत्पादकांना काहीसा नरम-गरम गेल्यामुळे तसेच द्राक्ष बागांच्या उशिराच्या काढणी मुळे उन्हाळ्यातील द्राक्षवेलींवर मालकाडी तयार करण्यासाठी करावी लागत असलेली खरड छाटणी उशिरा झाल्यामुळे द्राक्ष वेलींवर माल काड्या परिपक्व न झाल्याने त्याचा फटका काही शेतकर्‍यांना यावर्षी देखील बसण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

द्राक्ष वेली सशक्त राहण्यासाठी तसेच द्राक्षाच्या काड्या छाटणी नंतर द्राक्ष वेली मधून निरोगी व परिपक्व घड निघण्यासाठी द्राक्ष उत्पादकांकडून द्राक्ष वेलींना खतांच्या मात्रा देण्याचे काम जोमाने सुरू आहे. तसेच द्राक्षवेलींवर अळीचा प्रादूर्भाव दिसू लागल्याने कीड नियंत्रणासाठी औषधी फवारणी छाटणी अगोदर करण्याचे काम चालू आहे.

तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्ष छाटणी लांबणीवर गेल्याचे दिसून येत असून सप्टेंबर महिन्यात 30 टक्के द्राक्षबागांची छाटणी होत असते. परंतु हवामानात वेळोवेळी होत असलेले बदल व पावसाचे लपंडाव यामुळे यावर्षी द्राक्ष बागांची छाटणी (Pruning vineyards) लांबणीवर पडल्यामुळे परिणामी ‘एकच घाई संकटात नेई’ अशी परिस्थिती निर्माण होऊन माल तयार झाल्यानंतर विक्रीसाठी द्राक्ष उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

द्राक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे द्राक्षाच्या ऑक्टोबर तथा गोड छाटणीला वेग आला असून पावसामुळे लांबणीवर पडलेली छाटणी लवकर उरकून घेण्यासाठी सर्वच शेतकरी एकवटले आहे. त्यामुळे परिसरात मजुरांची टंचाई भासत आहे.

Related Stories

No stories found.