पाणी योजना व वीजेसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

पाणी योजना व वीजेसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यातील हिरेनगरला राष्ट्रीय पेयजल योजना (National Drinking Water Scheme) मंजूर झाली मात्र योजनेच्या वीजजोडणीची जागा हिरेनगरऐवजी नांदूर (Nandur) शिवारात निवडण्यात आली आहे.

नांदूर येथून वारंवार वीजपुरवठा खंडित (Power outage) होत असल्याने या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 15 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा हिरेनगर ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीसह (Electricity Distribution Company) तहसीलदार (Tehsildar) व पोलीस (Police) यंत्रणेला दिला आहे.

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, मंजूर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी जलवाहिनी (aqueduct), विहीर (well), जलकुंभ ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र योजनेच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी नाग्यासाक्या धरणापलीकडे (Nagyasakya Dam) हजार फुटाइतक्या लांब अंतरावरून केबल टाकण्यात आली आहे. ठेकेदाराने आपली आर्थिक बचत होण्यासाठी हिसवळ शिवारातून जोडणी करण्याऐवजी नांदूर येथून ही जोडणी केली आहे.

संबंधित ठेकेदाराने योजनेच्या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम देखील वाढवून घेतली. एवढे होऊनही योजनेतून हिरेनगरला पाण्याचा थेंब मिळू शकलेला नाही. हा संगमताने केलेला भ्रष्टाचार असून त्याच्या चौकशीसाठी येत्या 15 ऑगस्टपासून गावकरी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर संतोष बिन्नर, बापू बिन्नर, चंबू पवार, संपत पवार, अरुण पवार, भाऊसाहेब पवार, अक्काबाई पवार, उषा सोनवणे, निर्मला पवार, संगीता गुंजाळ, विठाबाई गुंजाळ, भास्कर गुंजाळ, म्हाळसाबाई माळी, भारती पवार, शरद दैने आदी गावकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com