सेवानिवृत्तीबद्दल जवानाची बैलगाडीतून काढली मिरवणूक

सेवानिवृत्तीबद्दल जवानाची बैलगाडीतून काढली मिरवणूक

नांदूरशिंगोटे | वार्ताहर | Nandurshingote

कणकोरी (Kankori) येथील भूमिपुत्र लष्करी जवान मधुकर सांगळे (Madhukar Sangale) यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडीतून (Bullock cart) मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिरही पार पडले...

हिंदवी स्वराज्य संघटना व नाभिक एकता महासंघाच्या संयुक्त उपक्रमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश सांगळे (Suresh Sangale), प्रसिद्धीप्रमुख अविन बिडवे (Avin Bidwe) यांनी ग्रामस्थ व युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. सुनील महाराज जगताप, राम महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

ग्रामस्थांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन मधूकर यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे भरून पावलो असून आपल्या माणसांनी केलेले कौतुक आणि पाठीवर दिलेली थाप यापुढील आयुष्यात प्रेरणा देणारी ठरेल, असे सांगळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

यावेळी सरपंच योगिता सांगळे, उपसरपंच अण्णा बुचकुल, रामनाथ सांगळे, गणेश सांगळे, सुरेश थोरात, संदीप कवडे, सूर्यभान सांगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com