खंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

खंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

देवळाली कॅम्प | वर्ताहर Deolali Camp

दैनंदिन खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे (Power supply) नाशिक (Nashik) तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथील नागरिक त्रस्त झाले असून या दोन्हीही गावांना स्वतंत्र २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा (Single phase power supply) करणारे रोहित्र बसविण्यात यावे याबाबत वंजारवाडी व लोहशिंगवे ग्रामस्थांनी खासदर हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना साकडे घातले असता या बाबद आपण सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभगाशी चर्चा करू असे आश्वासन दिले.

वंजारवाडी व लोहशिंगवे या दोन्हीही गावांना अनेक दिवसांपासून वीजेचा प्रश्न भेडसावत असून वीजेच्या दैनंदिन खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे येथील विद्यार्थ्यांना (Sudents) ऑनलाईन (Online) प्रणालीनुसार अभ्यास करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच महिलांना देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असून भटकंती करावी लागत आहे.

यासारख्या अनेक अडचणींना येथील ग्रामस्थांना भर पावसाळ्यात सामना करावा लागत असून येथील अनेक नागरिक हे गावाच्या जवळपास असलेल्या शेतवस्तीवर राहत असल्यामुळे येथे नेहमीच हिंस्ञश्वापदांचा वावर असतो. यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या दोन्हीही गावांना स्वतंत्र २४ तास सिंगल फेज वीजपुरवठा देण्यात यावा अशी मागणी वंजारवाडी व लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी खा गोडसे यांच्याकडे केली आहे.

तसेच नाशिक साखर कारखाना (Nashik Sugar Factory) सुरू होत असून यात खा. गोडसे यांचा मोठा सहभाग असल्याने ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला यावेळी वंजारवाडीचे सरपंच पैलवान ज्ञानेश्वर शिंदे लोहशिंगवे सरपंच युवराज जुंद्रे, वस्ताद भगवान जुंद्रे, माजी सरपंच संतोष जुंद्रे, ज्ञानेश्वर जैन, भाऊसाहेब जाधव, जगदीश शेठ रकिबे, कैलासभाऊ पाटोळे, भाऊ जुंद्रे, ज्ञानेश्वर मामा शिंदे, भास्करराव रायकर, निवृत्ती शिंदे, वाळू शिंदे, चंद्रभान शिंदे,सह दोन्ही गावातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com