
कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene
पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) येथील टोल नाक्यावरील (toll Plaza) कर्मचार्यांची दिवसेंदिवस अरेरावी वाढत चालली असून
या कर्मचार्यांकडून शेतकर्यांसह (farmers) इतर सर्वच वाहतूकदारांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे कारण दाखवत त्यांच्या विरोधात कसबे सुकेणे (kasbe sukene) येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) वतीने आंदोलनाचा (agitation) इशारा देण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील (toll naka) कर्मचारी नेहमीच अरेरावीची भाषा करत असून त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही.
अनेकवेळा त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्या तरी त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. कर्मचार्यांना टोल प्रशासनाकडून कोणतीही समज दिली जात नाही उलट त्यांना पाठीशी घालून निफाड तालुक्यातील (niphad taluka) शेतकरी (farmres) वर्गाला अनेकवेळा अडचणीत आणले जाते. लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या विरोधात आवाज उठवला असला तरी
त्याचीही फारशी दखल घेतली जात नसल्याचे कारण दाखवत कसबे सुकेणे युवक राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) आक्रमक भूमिका घेत कर्मचार्यांच्या वागणुकीत बदल न झाल्यास तीव्र आंदोलन (agitation) छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निफाड तालुका उपाध्यक्ष संभाजी सुर्वे, कसबे सुकेणे शहराध्यक्ष सचिन भंडारे, तालुका सरचिटणीस निलेश उगले आदींसह पदाधिकार्यांनी दिला आहे.
कर्मचार्यांना शिस्तीचे धडे देणे गरजेचे पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचार्यांना शिस्तीचे धडे देणे गरजेचे आहे. शेतकर्यांना वारंवार पिंपळगाव बसवंत येथे शेतमाल वाहतुकीसाठी ये-जा करावी लागते. अनेकवेळा शेतकर्यांच्या माल वाहतूक गाड्यांना त्यांच्याकडून अडचणी निर्माण केल्या जातात. त्यांच्या विरोधातील तक्रारीची दखल प्रशासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- संभाजी सुर्वे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष (कसबे सुकेणे)