पाणी पुरवठा योजना पूर्ववत करा, अन्यथा...; मांधा ग्रामस्थांचा गंभीर इशारा

पाणी पुरवठा योजना पूर्ववत करा, अन्यथा...; मांधा ग्रामस्थांचा गंभीर इशारा

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

सुरगाणा तालुक्यातील मांधा येथे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बोरवेलचे कनेशन तोडले व तीन हजार लिटर पाण्याची टाकी चौथऱ्यावरून लोटून देत नळ कनेशनही तोडले आहे. तसेच गावातील नागरिकांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर येत आहे....

याबाबत अरविंद गावित व ग्रामस्थ यांनी सुरगाणा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सरपंच मीरा तुळशीराम महाले व सदस्य तुळशीराम चिमण महाले, मनीराम काळू जाधव ,रमेश मनशेर सुकडीया, देवू नवशू गावित यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही कायदेशीर कोणतेही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मांधा ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर बेमुद्दत उपोषण केले.

यावेळी कॉ. संगीलाल पवार,अरविंद गावित, हरिश थोरात, ईश्वर पवार, वर्षा गायकवाड, मोहना गावित, सुमन चौधरी, चंद्रकला गायकवाड, जीवली गावित, मंगला गावित, सीताराम गायकवाड, दिलीप पवार, रामदास चौधरी, हरेस वाघमारे, भरत गायकवाड, कंचन देशमुख, भावना देशमुख, अब्रत देशमुख, विजय देशमुख, रंजना गावित, जणू गायकवाड, लली गावित, सुकरी गायकवाड, भीमा गायकवाड, लवगी गायकवाड, मोहना जाधव, निर्मला वाघमारे, खुराज्या पवार, योगेश पवार, जीवल्या पवार, त्रंबक गायकवाड, जगदीश गायकवाड, हिरामण ठाकरे, राम अलबाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

जो पर्यंत संबंधित आरोपींवर शासकीय गुन्हा दाखल होऊन नळ पाणी पुरवठा योजना पूर्ववत होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या वेळी गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी दोषींवर कायदेशीर कार्यवाही करणे व नळपाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेण्यासाठी आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com